शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७७ गावे, ३३ वाड्यांवर एप्रिलनंतर पाणी टंचाईची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:07 IST

धुळे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५६६.३० मि.मी. आहे. मात्र २०१९ मध्ये ८४४.३८ व २०२० मध्ये ७३०.१५ मि.मी. पावसाची नोंद झाली. ...

धुळे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५६६.३० मि.मी. आहे. मात्र २०१९ मध्ये ८४४.३८ व २०२० मध्ये ७३०.१५ मि.मी. पावसाची नोंद झाली. म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याला दुष्काळाची झळ सहन करावी लागत होती. मात्र दोन वर्षांपासून होत असलेल्या मुबलक पावसामुळे पाणी टंचाईची समस्या नसल्यासारखीच आहे.

दरवर्षी साधारणत: ११० ते १३० गावांना व ८० पेक्षा अधिक पाड्यांना पाणी टंचाईची झळ बसत असते. या पाणी टंचाई निवारणार्थ प्रशासनाला ॲाक्टोबर महिन्यापासूनच पाणी टंचाईचा कृती आराखडा तयार करावा लागतो. विशेष म्हणजे जिल्ह्यातील धुळे व शिंदखेडा तालुक्यातील काही गावांना बाराही महिने पाणी टंचाई भासत असते. तेथे वर्षातील नऊ-दहा महिने टँकरनेच पाणी पुरवठा करावा लागतो, अशी स्थिती असते. मात्र दोन वर्षांपासून येथील परिस्थिती पूर्णत: बदललेली आहे. मुबलक पावसामुळे सर्वच ठिकाणी पाण्याची मुबलकता असल्याने, परिणामी पाणी टंचाई नाही. गेल्यावर्षी जिल्ह्यात २-३ गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे.

यावर्षी ७७ गावांना टंचाईची शक्यता

गेल्यावर्षही मुबलक प्रमाणात पाऊस असल्याने, जिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यंत पाणी टंचाई जाणवणार नाही अशी शक्यता आहे. मात्र पुढील दीड महिन्यात टंचाईची शक्यता गृहीत धरून आराखडा तयार करण्यात आलेला आहे. धुळे तालुक्यातील १२ गावे, साक्री तालुक्यातील २५ गावे व २६ पाडे, शिरपूर तालुक्यातील १८ गावे व ६ पाडे, तसेच शिंदखेडा तालुक्यातील २२ गावे व १ पाड्यावर टंचाईची शक्यता आहे. या टंचाई निवारणार्थ काही ठिकाणी टँकरने तर काही ठिकाणी खासगी विहीर अधिग्रहित करून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. यासाठी तब्बल ११० उपाययोजना आहेत.

यावर्षी भर उन्हाळ्यात महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. असे असले तरी पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे.

पाणी टंचाईसाठी आराखडा तयार

दरवर्षी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व भूजल सर्वेक्षण विभाग हे दोघे संयुक्तरित्या पाणी टंचाईचा आराखडा तयार करीत असतात. यात कोणत्या महिन्यात किती गावांना पाणी टंचाई जाणवू शकते याचे नियोजन करून त्यावर उपाययोजना केलेल्या असतात. त्यामुळे टंचाईवर मात करणे शक्य होते.

यावर्षी मिळाला दिलासा

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. त्यामुळे पाणी टंचाईपासून जिल्हावासीयांना मुक्तता मिळालेली आहे. दोन वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यापासूनच पाणी टँकरची मागणी केली जायाची. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एकही टँकर सुरू नाही.

एकाही गावाला अद्याप टँकर सुरू झालेला नाही

धुळे तालुका व शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांना दरवर्षी पाणी टंचाईची झळ बसत असते. काही गावे तर टँकरवरच अवलंबून असतात अशी स्थिती आहे. मात्र दोन वर्षांपासून अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस होत असल्याने, अजून एकाही गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू झालेला नाही.

संभाव्य टंचाईसाठी विहीर अधिग्रहण प्रस्तावित

जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पाणी टंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती आहे. त्यानंतर काही गावांना पाणी टंचाईची झळ बसू शकते. यावर पर्याय म्हणून पाणी पुरवठा विभागाने ९९ विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव तयार करून ठेवलेला आहे. यात धुळे तालुक्यातील १२ वाडे, साक्री तालुक्यातील २१ गावे ४५ वाडे, शिरपूर तालुक्यातील ६ गावे २४ वाडे, व शिंदखेडा तालुक्यातील १ गाव व १८ वाड्यांचा समावेश आहे.