शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

धुळे जिल्हयात ४६ साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 16:05 IST

जिल्हा परिषद : साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

ठळक मुद्देमंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हयातील १०३ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे जि.प. सदस्यांनी दूषित पाण्याचा प्रश्न उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली होती. सद्य:स्थितीत ज्या गावांना दूषित पाणीपुरवठा होतो आहे; त्या गावांना शुध्द पाणी देण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनासमोर राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :    पावसाळयाच्या तोंडावर साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्हयात ४६ साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात आले आहे. साथीच्या आजारांचा फैलाव होउ नये; यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून ग्रामीण भागात जनजागृतीही केली जात आहे. जिल्हयाची ग्रामीण लोकसंख्या १४, ७७, ६२६ व शहरी भागाची लोकसंख्या ५, ६२, ०३६ अशी एकूण २० लाख ३९ हजार ६६२ इतकी लोकसंख्या आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात ४१ प्राथमिक आरोग्य केंद्र, २३२ उपकेंद्र व १३ आयुर्वेदीक दवाखाने आहेत. पावसाळयात साथीच्या आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्हयातील ४१ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी साथ नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. तसेच साक्री, शिरपूर व धुळे पंचयात समिती परिसर व शिंदखेडा शहरातील ग्रामीण रुग्णालयात हा कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीया इमारतीतही हा विभाग कार्यान्वीत करण्यात आला आहे. २४ तास सुरू राहणार कक्ष; ८२ पथकांची नियुक्ती२ आॅक्टोबर २०१८ पर्यंत साथरोग नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. यासाठी आरोग्य विभागामार्फत ८२ पथकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक पथकात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य साहाय्यक,  आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, परिचर व वाहनचालक आदींचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लागणारा औषधांचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी परिपूर्ण ठेवण्यात आला आहे. 

विरखेलला दिली पथकाने भेट साक्री तालुक्यातील विरखेल येथे संसर्गजन्य आजाराचे २५ रूग्ण आढूळन आल्यानंतर बुधवारी आरोग्य विभागाच्या पथकाने गावात भेट दिली. त्यावेळी संबंधित रुग्णांची तपासणी केली असता, त्यांना सांधदुखी किंवा व्हायरल               फि व्हर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून संबंधित रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.  या वेळी डॉ. एस.व्ही.सांगळे, डॉ. आर.व्ही. पाटील, डॉ. संजय मोरे, जि.प. सदस्य विलास बिरारीस आदी उपस्थित होते. संशयित १३ रुग्णांचे नमुने गेले तपासणीला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे  ८ व ९ जूनला जिल्हयातील १३ रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतले आहे. पैकी ६ नमुने हे डेंग्यू, व चिकनगुनिया तर उर्वरित ७ संशयित रुग्णांचे रक्तनमुने  हे मलेरिया आजारासाठी घेतल्याची माहिती जिल्हा साथरोग शास्त्रज्ञ राजेश भोसले यांनी दिली. हे रक्तनमुनेही तपासणीसाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आल्याचे ते म्हणाले.