१०७८ विवाहांसह आश्वासक वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 22:30 IST2019-03-24T22:29:40+5:302019-03-24T22:30:03+5:30

जन्मबंध व्हॉट्सअप ग्रु्रप। मोफत समाजकार्याचा ठरतोय आदर्श नमुना

1078 marriage promises support! | १०७८ विवाहांसह आश्वासक वाटचाल!

१०७८ विवाहांसह आश्वासक वाटचाल!

संडे हटके बातमी
सुरेश विसपुते । 
लोकमत न्यूज नेटवर्क 
धुळे : जन्मबंध व्हॉट्स अप ग्रुपने नुकताच तब्बल १ हजार विवाहांचा पल्ला गाठला असून २ हजाराव्या विवाहाकडे आगेकूच सुरू केली आहे. समस्त सुवर्णकार समाजबांधवांमध्ये या ग्रुपने मोठा विश्वास निर्माण केला आहे. विवाह जमविणारा हा जगातील पहिलाच व्हॉट्सअप ग्रुप असावा! विवाह जुळविण्याच्या सध्याच्या अत्यंत कठीण काळात १ हजार विवाहांचा पल्ला गाठणे ही बाब गौरवास्पद तसेच प्रेरणादायी ठरली आहे. 
सोशल मीडियाचा समाजाच्या भल्यासाठी उपयोग करता येतो, याचे जन्मबंध ग्रुप हे मूर्तीमंत उदाहरण ठरले आहे. मुंबई महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या प्रभाकर मोरे यांनी २०१५ साली विवाह जुळवण्यातील अडचणी लक्षात घेऊन या व्हॉट्सअप ग्रुपची सुरूवात झाली. आरंभी केवळ अहिर सुवर्णकार समाजातील उपवरांचा फोटोसह परिचय ग्रुपच्या माध्यमातून समाजबांधवांना करून दिला जात होता. मात्र वर्षभरापासून समाजातील लाड, पांचाळ, दैवज्ञ, झाडे, माळवी, वैश्य या अन्य आंतरशाखाही गरजेतून संलग्न झाल्या असून आतापर्यंत असे आंतरशाखीय ५८ विवाह संपन्न झाले आहेत. १४ वा मेळावा ५ मे रोजी सटाणा येथे तर १५ वा मेळावा आॅगस्ट महिन्यात संगमनेर येथे होणार आहे. 
या शिवाय सोलापूर, अकोला, पंढरपूर, अकोट येथील समाजबांधवही मेळाव्यांसाठी उत्सूक आहेत. या सर्व कार्यासाठी ४५० कार्यकर्ते मोफत सेवा देत असून रोज अनेक कार्यकर्ते या कार्याशी जुळत आहेत. समाजात या संदर्भात विपरित परिस्थिती असताना ‘जन्मबंध’ ग्रुपचे आगमन झाले. समाजाकडून एक नया पैशाची अपेक्षा न करता सुरू झालेल्या या उपक्रमाचे एक झंझावातात रूपांतर झाले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आज केवळ उपवर किंवा त्यांचे पालकच नव्हे तर समस्त समाजबांधव ‘जन्मबंध’ या एका सूत्रात बांधले जात आहेत. 
दोन्ही बाजूच्या वादविवादामुळे जे विवाह संकटात आले आहेत, अशा प्रकरणांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी राज्यात निरनिराळ्या ५८ ठिकाणी तंटानिवारण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. समितीत ७ पुरूष व ३ महिलांचा समावेश केला आहे. अध्यक्षांच्या नेतृत्वात समिती सदस्यांनी १८ प्रकरणांमध्ये समेट घडविण्यात यश मिळविले आहे. वाद थांबवून मुली नांदण्यासाठी आल्या तर काही प्रकरणात मुलांनीही पुढाकार घेतला. यामुळे कटुता संपुष्टात आली असून आनंदाने हे संसार सुरू झाले आहेत.  
१३ वधू-वर मेळावे झाले यशस्वी
४आज या ग्रुपचे ३० हजार सभासद असून कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्टÑासह गुजरात, मध्य प्रदेश राज्यात विस्तारले आहे. वर्र्षानुवर्षे थांबलेली लग्ने यामुळे होत आहेत. या ग्रुपचे सद्यस्थितीत १८० व्हॉट्सअप ग्रुप असून त्याद्वारे ८ हजार उपवरांची नोंदणी झाली असून १३ वधू-वर मेळावे यशस्वीरीत्या पार पडले आहेत. 

Web Title: 1078 marriage promises support!

टॅग्स :Dhuleधुळे