शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलपाड्यातून १० हजार क्युसेसचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:37 IST

पांझरेला पुन्हा पूर : नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

धुळे : शहरासह जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आणि साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यात संततधार पाऊस सुरु आहे़ दमदार पावसामुळे धरणांमधूनही पाणी सोडले जात आहे़ शनिवारी सकाळी १० वाजेनंतर अक्कलपाडा धरणातून तब्बल १० हजार क्युसेस प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे़ त्यामुळे पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे़ नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे़ सुरक्षितता म्हणून गणपती मंदिराजवळ पोलीसही तैनात करण्यात आले़ जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १३९ टक्के पाऊस झालेला आहे़ जिल्ह्यातील चारही तालुक्यांनी सरासरीची शंभरी ओलांडली आहे़ साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यात तर पावसाची संततधार सुरुच आहे़ आमळी, पिंपळनेर परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे मालनगाव, जामखेली, लाटीपाडा ही धरणे शंभर टक्के भरुन वाहत असल्याने अक्कलपाडा धरणात पाण्याची आवक वाढली आहे़ सकाळी १० वाजेच्या सुमारास पांझरा नदीपात्रात प्रति सेंकद १० क्युसेस याप्रमाणे पाणी सोडण्यात आले आहे़ गेल्या दोन दिवसांपुर्वी देखील अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आले होते़ त्यामुळे पांझरा नदी दुथडी भरुन वाहत आहे़ त्यात पुन्हा शनिवारी पाणी सोडण्यात आल्याने पांझरा नदीला पूर आलेला आहे़ हे पाणी हळूहळू धुळ्यात येत असल्यामुळे नदी काठच्या नागरीकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे़ पाण्याचा वाढणारा प्रवाह आणि नागरीकांनी नदीपात्रात जावू नये, त्यांचे जीवन सुरक्षित असावे यासाठी गणपती मंदिराजवळ पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे़ पुराची शक्यता असल्याचे समोर येत आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे