शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या व्याजदरात १ टक्का कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST

शिरपूर : बँक संचित तोट्यात असतानाही केवळ सभासदांचे हित लक्षात घेऊन बँकेच्या सर्व कर्जावरील व्याजदरात १ टक्का कपात करण्याचा ...

शिरपूर : बँक संचित तोट्यात असतानाही केवळ सभासदांचे हित लक्षात घेऊन बँकेच्या सर्व कर्जावरील व्याजदरात १ टक्का कपात करण्याचा महत्त्वपूर्ण व धाडसी निर्णय धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेच्या ९९ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. इतकेच नव्हे तर कोणत्याही कारणास्तव सभासदांचा मृत्यू झाल्यास त्याला संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी लोकमान्य कर्जमुक्ती फंड योजनेसही पोटनियम दुरुस्तीच्या माध्यमातून सभासदांनी मंजुरी दिली.

धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांच्या बँकेची ९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी शिरपूर येथील केव्हीटीआर, सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहातून ऑनलाईन घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेच्या चेअरमन विद्या रामकृष्ण मोरे-शिंदे होत्या. यावेळी सभागृहात बँकेचे गटनेते निशांत विश्वासराव रंधे, रवींद्र उत्तम खैरनार, व्हॉ. चेअरमन संदीप कैलासराव मराठे व संचालक मंडळ उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना बँकेच्या चेअरमन म्हणाल्या की, अवघ्या महिन्याभरात दोन कोटींचा एनपीए कमी झाला आहे. येत्या काळात सर्वांच्या सहकार्याने बँकेला सक्षम बनवायचे आहे, थकबाकीतून मुक्त करावयाचे आहे. आजच्या सभेत मृत सभासदांबाबत महत्त्वपूर्ण लोकमान्य कर्जमुक्ती फंड योजनेस पोटनियम दुरुस्तीच्या माध्यमातून मान्यता घेत आहोत. त्यामुळे येत्या काळात सभासदाचा मृत्यू झाल्यास त्यांना तातडीने यापूर्वी दोन हजार रुपये मदत देण्यात येत होती. ती आता १० हजार रुपये इतकी करणे. तसेच संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने ही योजना प्रस्तावित केली आहे.

पोटनियम दुरुस्तीस सभासदांनी मान्यता दिल्याने याबाबत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक यांची मान्यता मिळाल्याबरोबर मृत सभासदांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचाही निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. बँकेच्या सभासदांनी कर्मचाऱ्यांबाबत उपस्थित केलेल्या वेतनांच्या प्रश्नाबाबत दखल घेत कर्मचाऱ्यांच्या कर्जावरील व्याजदरात देखील एक टक्का कपात करण्याचा निर्णयास यावेळी मंजुरी देण्यात आली. बँक तोट्यात असताना प्रशासक काळात झालेल्या पदोन्नती प्रक्रियेबाबतदेखील सभासदांनी प्रश्न उपस्थित केल्याने तसेच लेखी स्वरूपात या संदर्भात चर्चेची मागणी केल्याने कर्मचारी पदोन्नतीबाबत त्वरित समिती नेमून चौकशीअंती या प्रक्रिया नियमबाह्य आढळल्यास ती त्वरित रद्द करण्यात येईल, असा ठराव देखील यावेळी करण्यात आला.