मनपा हद्दवाढीतील तीन गावांच्या विकासकामांसाठी १ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:29 IST2021-07-25T04:29:59+5:302021-07-25T04:29:59+5:30

धुळे : शहरातील हद्दवाढीतील गावामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत होते. याबाबत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ...

1 crore sanctioned for development works of three villages in the municipal boundary | मनपा हद्दवाढीतील तीन गावांच्या विकासकामांसाठी १ कोटींचा निधी मंजूर

मनपा हद्दवाढीतील तीन गावांच्या विकासकामांसाठी १ कोटींचा निधी मंजूर

धुळे : शहरातील हद्दवाढीतील गावामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत होते. याबाबत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार फारुख शाह यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार शाह यांनी तीन गावांच्या विकासकामांसाठी १ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

धुळे “ड” वर्गाची महानगरपालिका असल्याने मनपाला उत्पन्न पुरेसे नसल्यामुळे शहरासह हद्दीतील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविता येणे शक्य होत नाही. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील आजही अनेक गावांमध्ये मूलभूत सोईसुविधा नाहीत. त्यामुळे

शहरात व हद्दवाढ गावात प्रामुख्याने रस्ता व गटारींची कामे झालेली नसल्याने नागरिकांना सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. धुळे महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता मनपाकडे विकासकामे करण्यासाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांनी समस्या सोडविण्याबाबत आमदार फारुक शाह यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार आमदार फारुक शाह यांनी मनपा हद्दीतील महिंदळे, चितोड, बाळापूर येथील कॉलनीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी १ कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला. राज्याचे ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन हा निधी मंजूर केला आहे.

Web Title: 1 crore sanctioned for development works of three villages in the municipal boundary