जलसंधारण कामात पाणीसाठा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST2021-07-11T04:22:42+5:302021-07-11T04:22:42+5:30
आंबी येथील तीन तलाव अनेक वर्षांपूर्वी फुटलेल्या अवस्थेत होते. या तिन्ही तलावांचे भराव मधूनच फुटल्यामुळे पाणी टिकून राहत नव्हते. ...

जलसंधारण कामात पाणीसाठा वाढला
आंबी येथील तीन तलाव अनेक वर्षांपूर्वी फुटलेल्या अवस्थेत होते. या तिन्ही तलावांचे भराव मधूनच फुटल्यामुळे पाणी टिकून राहत नव्हते. या जलसंधारणाच्या कामावेळी या तलावांचीही दुरुस्ती करण्यात आली. यामुळे यातही चांगला जलसाठा निर्माण होत आहे. भराव बुजवून गाळ काढण्यात आला असून, हा गाळ शेजारील शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आला. यामुळे माळरानावरील बरीच जमीन सुपीक झाली आहे. आंबी येथील नदीवरील एक सिमेंट बंधारा चार वर्षांपूर्वी वाहून गेला होता. तो देखील नव्याने बांधण्यात आला. या कामासाठी गावऱ्यांनीदेखील लोकसहभाग दिला. सिमेंट बंधाऱ्यासाठी लागणारा दगड शेतकऱ्यांकडून पुरविण्यात आला. या कामामुळे तलाव परिसरातील विहिरींच्या जलसाठ्यात चांगला फरक पडत आहे. बोअरलाही देखील पाणी वाढत असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.