पावणेदोन लाख बालकांना मिळणार पोलिओची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:18 IST2021-02-05T08:18:15+5:302021-02-05T08:18:15+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात ३१ जानेवारीला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत शून्य ते पाच ...

Two and a half lakh children will get polio vaccine | पावणेदोन लाख बालकांना मिळणार पोलिओची मात्रा

पावणेदोन लाख बालकांना मिळणार पोलिओची मात्रा

उस्मानाबाद : जिल्ह्यात ३१ जानेवारीला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील १ लाख ७३ हजार ७७२ लाभार्थी बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत ऊसतोड कामगारांच्या झोपड्या, फिरत्या कामगारांच्या वस्त्या, बांधकामे या ठिकाणे असलेली बालके लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष लक्ष देऊन जास्तीत जास्त बालकांना लस देण्याबाबत नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यात १३०१ बूथची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ११९०, तर शहरी भागासाठी १११ बूथचे नियोजन आहे. या मोहिमेसाठी आरोग्य कर्मचारी, आरोग्य पर्यवेक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी मदतनीस, आशा स्वयंसेविका, पर्यवेक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हास्तरीय अधिकारी यांचा सहभाग असणार आहे. शून्य ते पाच वर्षे या वयोगटातील ग्रामीण भागातील १ लाख ५६ हजार ३२५, तर शहरी भागातील १७ हजार ४४७ अशी एकूण १ लाख ७३ हजार ७७२ लाभार्थी बालक असतील. या व्यतिरिक्त मोबाईल व टांझिट टीमची सोय करण्यात आलेली असून, यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे.

या मोहिमेमध्ये पालकांनी आपल्या पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना नजीकच्या बूथवर नेऊन पोलिओ लसीचा डोस द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील यांनी केले.

चौकट.....

या विभागांची घेणार मदत

या मोहिमेत शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, विद्युत महामंडळ, एस. टी. महामंडळ, सामाजिक मंडळे, आदी मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी दिली.

Web Title: Two and a half lakh children will get polio vaccine