धाराशिव : ट्रॅक्टर आणि जेसीबी भाड्याने घेण्याच्या बहाण्याने १ कोटी २२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २९ जानेवारी २०२५ पासून ४ डिसेंबर दरम्यान घडली असून, आरोपींनी विश्वास संपादन करून २२ ट्रॅक्टर व २ जेसीबी वाहने हडपल्याचे उघड झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील सरताळे येथील आरोपी अजय संतोष चव्हाण, रफीक अब्दुल शेख (रा. दशमेगाव) यांनी कळंब कोर्टाजवळील ॲड. चोंदे यांच्या कार्यालयात फिर्यादी व इतर २४ वाहनमालकांना सुरुवातीला डिपॉझिट देऊन आमिष दाखवले. यावेळी त्यांनी ट्रॅक्टरसाठी दरमहा ३० हजार रुपये व जेसीबीसाठी १ लाख रुपये भाड्याचा करार केला. या नोटरीच्या आधारावर आरोपींनी २४ वाहने मालकांच्या घरून घेऊन पलायन करून अंदाजे १ कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी वाशी तालुक्यातील दशमेगाव येथील फिर्यादी बालाजी श्रीहरी मोरे यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), २३६, २३७ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून, दोन्ही आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
Web Summary : Two individuals are accused of defrauding vehicle owners of ₹1.22 crore by using a false rental agreement to take 22 tractors and 2 JCBs. A police case has been registered, and a search for the suspects is underway.
Web Summary : फर्जी किराया समझौते के तहत 22 ट्रैक्टर और 2 जेसीबी लेकर दो लोग 1.22 करोड़ रुपये की धोखाधड़ी करके फरार हो गए। पुलिस ने मामला दर्ज कर आरोपियों की तलाश शुरू कर दी है।