शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
3
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
4
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
5
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
6
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
7
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
8
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
9
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
10
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
11
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
12
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
13
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
14
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
15
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
16
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
17
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
18
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
19
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
20
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
Daily Top 2Weekly Top 5

झाडांचाही साजरा होतोय सार्वजनिक वाढदिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:23 IST

कळंब : आजवर आपण नेत्यांचे, युवा नेत्यांचे वाढदिवस पाहिले; परंतु, ईटकूर येथे ‘हरित ईटकूर’ उपक्रमांतर्गत मागच्या तीन वर्षांपासून जोपासलेला ...

कळंब : आजवर आपण नेत्यांचे, युवा नेत्यांचे वाढदिवस पाहिले; परंतु, ईटकूर येथे ‘हरित ईटकूर’ उपक्रमांतर्गत मागच्या तीन वर्षांपासून जोपासलेला झाडांचा वाढदिवस अगदी सार्वजनिक स्वरूपात साजरा करून नव्या वर्षाच्या संकल्पाची मुहूर्तमेढ रोवली जाते. यंदा हा सोहळा मंगळवारी पार पडला.

एकेकाळी उजाड अन् ओसाड गाव म्हणून हिणवल्या जाणाऱ्या ईटकूर गावात मागच्या तीन वर्षांपासून गावाला हिरवं करण्याचे स्वप्न घेऊन काही युवक धडपडत आहेत. या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठीच ‘आपलं ईटकूर-हरित ईटकूर’ या चळवळीचा श्रीगणेशा झाला. यासाठी हरित ईटकूर समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या माध्यमातून बाबा जगताप, अमर आडसूळ, अभयसिंह आडसूळ, महेश आडसूळ, प्रकाश फरताडे, प्रभाकर आडसूळ, बिभीषण देसाई, नवनाथ आडसूळ, राहुल तोरगले, समाधान गाडे यांच्यासह असंख्य युवकांनी ‘हरित ईटकूर’ या बॅनरखाली एकत्र येत वृक्ष लागवड व संगोपनावर भर देणारा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली. यातून झोपडपट्टी भागात नारळाची बाग, मुख्य रस्त्यावर शोभेची, बाजार मैदानात लिंब, करंजी, सप्तपर्णी, ग्राप समोर वटवृक्ष, पशुवैद्यकीय दवाखाना आदी भागात आजवर विविध पाचशे झाडांची जोपासना करण्यात आली आहे.

दरवर्षी १३ जुलैरोजी या झाडांचा वाढदिवस, वृक्षपूजन व नवीन वर्षाचा संकल्प वृक्ष लागवड करून करण्यात येतो. यंदाचा हा सोहळा आ. कैलास पाटील, राष्ट्रवादीचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्याहस्ते पार पडला. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय आडसूळ, शिवसेनेचे प्रवीण कोकाटे, वन अधिकारी सचिन लोंढे, माजी जि. प. सदस्य बालाजी आडसूळ, सरपंच मोहरबाई कस्पटे, रोटरीचे सचिव अरविंद शिंदे, पदाधिकारी डॉ. गिरीश कुलकर्णी, हर्षद अंबुरे, वैजनाथ पकवे, भगतसिंग गहेरवार, केमिस्टचे अध्यक्ष प्रमोद पोते आदी उपस्थित होते. यावेळी अमर आडसूळ, बाबा जगताप, अभयसिंह आडसूळ यांनी स्वागत केले, तर सेवानिवृत्त आदर्श शिक्षक तुकाराम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट...

यंदा सातशे वृक्ष जगवण्याचा संकल्प...

मागच्या तीन वर्षांत पाचशेच्या आसपास झाडं जगवण्याचे, वाढवण्याचे धनुष्य पेलल्यानंतर हरित ईटकूर समितीने कळंब रस्त्यावर दुतर्फा सातशे झाडे लावली आहेत. यात नारळ, बदाम, मोहगणी अशा विविध वृक्षांचा समावेश आहे. यासाठी लोकवर्गणी जमा करण्यात येते. मंगळवारी गावचे सुपुत्र तथा मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय बाबूराव आडसूळ यांनी २५ हजारांची मदत करून उपक्रमास बळ दिले.