आठवडे बाजारात हात मारणारे तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:19 IST2021-02-05T08:19:04+5:302021-02-05T08:19:04+5:30

उस्मानाबाद - कळंब येथील आठवडे बाजारात व्यापाऱ्यांसह बाजारकरूंचे माेबाईल चाेरणाऱ्या तिघांना रंगेहात पकडले. या प्रकरणी संबंधितांविरूद्ध १ फेब्रुवारी राेजी ...

Three arrested for beating hands in the market for weeks | आठवडे बाजारात हात मारणारे तिघे ताब्यात

आठवडे बाजारात हात मारणारे तिघे ताब्यात

उस्मानाबाद - कळंब येथील आठवडे बाजारात व्यापाऱ्यांसह बाजारकरूंचे माेबाईल चाेरणाऱ्या तिघांना रंगेहात पकडले. या प्रकरणी संबंधितांविरूद्ध १ फेब्रुवारी राेजी कळंब ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील आथर्डी येथील शिवदास रावसाहेब खराडे हे १ फेब्रुवारी राेजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कळंब येथील आठवडे बाजारात आले हाेते. ते खरेदीत व्यस्त असतानाच गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशातील स्मार्ट फाेन लांबविला. हे लक्षात येताच शिवदास खराडे यांनी आरडा-ओरड केल्याने बाजारातील लाेक व पाेलिसांनी अशाेक लक्ष्मण जाेजारे (वय ५२), आकाश भास्कर वाघमारे (वय २६), माेहसीन रफिक शेख (वय ३२, तिघे रा.बीड) यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता, अशाेक जाेजारे याच्याजवळ शिवदास खराडे यांचा फाेन आढळून आला. यानंतर पथकाने जाेजारे यासह त्याचे अन्य साथीदार व ऑटाे रिक्षा (क्र. एमएच.२३-एआर.०२३३) ताब्यात घेतला. या प्रकरणी शिवदास खराडे यांच्या फिर्यादीवरून उपराेक्त तिघांविरूद्ध भादंसंचे कलम३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: Three arrested for beating hands in the market for weeks