चोर गारठले, सोन्यासह ब्लँकेट चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST2021-07-24T04:19:54+5:302021-07-24T04:19:54+5:30

चोरटे कधी काय पळवून नेतील याचा आता नेम राहिला नाही. मसला खुर्द येथील मैनाबाई चंद्रशेखर दळवी यांच्या बंद घराचे ...

Thieves stole, stole blankets with gold | चोर गारठले, सोन्यासह ब्लँकेट चोरले

चोर गारठले, सोन्यासह ब्लँकेट चोरले

चोरटे कधी काय पळवून नेतील याचा आता नेम राहिला नाही. मसला खुर्द येथील मैनाबाई चंद्रशेखर दळवी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. शिवाय, याच गावातील खंडू मारुती नरवडे यांच्याही घरी चोरी करीत येथून १७ हजारांची रोकड पळविली. दरम्यान, जाता-जाता चोरट्यांनी गावातीलच छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालयाकडे मोर्चा वळविला. येथे कार्यालयात ठेवलेले दोन ब्लँकेट चोरट्यांच्या हाती लागले. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस व ढगाळ वातावरण असल्याने गारठा निर्माण झाला आहे. त्यामुळे चोरट्यांनी कदाचित हे ब्लँकेटही सोडले नाहीत. दरम्यान, चोरीच्या घटनेप्रकरणी मैनाबाई दळवी यांनी तामलवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Thieves stole, stole blankets with gold