ईट येथे दोन दुकाने फोडून रोख रक्कमेसह मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 19:39 IST2019-02-13T19:39:03+5:302019-02-13T19:39:55+5:30
मध्यरात्री चोरट्यांनी कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला.

ईट येथे दोन दुकाने फोडून रोख रक्कमेसह मुद्देमाल लंपास
ईट (उस्मानाबाद): भूम तालुक्यातील ईट येथील बसस्थानकाजवळ असणारे किराणा व बेकर्सची दोन दुकाने चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कमसह ४९ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.
ईट येथे मुख्य बसथांब्याजवळ गणेश मंदिराच्या पाठिमागे संजय चिखले यांचे किराणा स्टोअर्स तर गणेश चिखले यांचे बेकर्सचे दुकान आहे. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम आणि मुद्देमाल घेऊन पोबारा केला. आज सकाळी सकाळी दुकान उघडण्यासाठी गणेश चिखले आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. महादेव राऊत व पोकॉ. सुरेश राऊत करत आहेत.