चाेरट्यांचा धुमाकूळ, माेबाईल मनाेऱ्याच्या ४८ बॅटऱ्या लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:19 IST2021-02-05T08:19:02+5:302021-02-05T08:19:02+5:30

उस्मानाबाद -जिल्ह्यात चाेरट्यांचा धुमाकूळ काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. भूम तालुक्यातील वालवड येथील माेबाईल टाॅवरच्या सुमारे ४८ बॅटऱ्या ...

A swarm of fours, 48 batteries of Mobile Manera Lampas | चाेरट्यांचा धुमाकूळ, माेबाईल मनाेऱ्याच्या ४८ बॅटऱ्या लंपास

चाेरट्यांचा धुमाकूळ, माेबाईल मनाेऱ्याच्या ४८ बॅटऱ्या लंपास

उस्मानाबाद -जिल्ह्यात चाेरट्यांचा धुमाकूळ काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. भूम तालुक्यातील वालवड येथील माेबाईल टाॅवरच्या सुमारे ४८ बॅटऱ्या लंपास केल्या. दुसरीकडे जळकाेटच्या बाजारातून दाेन मित्रांचे माेबाईल लंपास केले. तर येणेगूर येथून घरासमाेरील दुचाकी पळविली. या प्रकरणी संबंधित ठाण्यात २ फेब्रुवारी राेजी गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वालवड येथे इंडस कंपनीचा माेबाईल मनाेरा आहे. या मनाेऱ्याखालील प्रणाली कक्षात ४८ बॅटऱ्या हाेत्या. अंधाराचा फायदा घेत अज्ञात चाेरट्यांनी ७ ते ८ जानेवारी या कालावधीत सर्व बॅटऱ्या लंपास केल्या. चाेरीची ही घटना सुरक्षा पर्यवेक्षक अमाेल काशिनाथ ढवण (रा. खंडाळा) यांच्या निदर्शनास येताच त्यांनी भूम पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरूद्ध भादंसंचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत, तुळजापूर तालुक्यातील जळकाेट येथील कमलाकर पांडुरंग भाेसले व त्यांचा मित्र हे दाेघे ३० जानेवारी राेजी गावातीलच आठवडी बाजारासाठी गेले हाेते. गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने या दाेन्ही मित्रांचे माेबाईल लंपास केले. माेबाईल चाेरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर भाेसले यांनी नळदुर्ग पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाैकट...

घरासमाेरून दुचाकी लंपास

उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील बसवराज गुंजाेटे यांनी आपली दुचाकी (क्र. एमएच.२५-एजी. ३५९४) घरासमाेर उभी केली हाेती. आजूबाजूला काेणीही नसल्याची संधी साधत अज्ञाताने दुचाकी लंपास केली. ही घटना समाेर आल्यानंतर गुंजाेटे यांनी मुरुम पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: A swarm of fours, 48 batteries of Mobile Manera Lampas