‘सीईओ’ राहुल गुप्ता यांनी स्वीकारली सूत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:02+5:302021-07-02T04:23:02+5:30

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांची अवघ्या आठ महिन्यात शासनाने वैधानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी बदली ...

Sources accepted by 'CEO' Rahul Gupta | ‘सीईओ’ राहुल गुप्ता यांनी स्वीकारली सूत्रे

‘सीईओ’ राहुल गुप्ता यांनी स्वीकारली सूत्रे

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांची अवघ्या आठ महिन्यात शासनाने वैधानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी बदली केली. त्यांच्या जागी गडचिराेलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. बदलीचे आदेश बुधवारी निघताच थाेडाही विलंब न करता गुप्ता यांनी गुरुवारी दुपारी डाॅ. फड यांच्याकडून सीईओ पदाची सूत्रे हाती घेतली. यानंतर विभाग प्रमुखांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संजय तुबाकले, नितीन दाताळ, कार्यकारी अभियंता भाेसले, जिल्हा कृषी अधिकारी डाॅ. टी. जी. चिमनशेट्टे, महिला व बालकल्याण अधिकारी बळीराम निपाणीकर, एस. जी. केंद्रे, कवडे आदी उपस्थित हाेते. सीईओ गुप्ता हे शुक्रवारी विभाग प्रमुखांची बैठक घेणार आहेत. त्यामुळे यानंतरच त्यांच्या कामाची दिशा स्पष्ट हाेईल.

Web Title: Sources accepted by 'CEO' Rahul Gupta