शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशाच्या राजधानीत घुमला आवाड शिरपुऱ्यातील मृदंगाचा नाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:31 IST

कळंब : तालुक्यातील आवाड शिरपुरा येथील सुपुत्र तथा प्रसिद्ध मृदंगाचार्य प्रताप आवाड यांच्या मृदंगाचा नाद बांग्लादेशची राजधानी ढाका येथे ...

कळंब : तालुक्यातील आवाड शिरपुरा येथील सुपुत्र तथा प्रसिद्ध मृदंगाचार्य प्रताप आवाड यांच्या मृदंगाचा नाद बांग्लादेशची राजधानी ढाका येथे घुमला. बांग्लादेशच्या पन्नासाव्या स्वातंत्र्यदिनी आयोजित सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासमोर झालेल्या संगीत रजनीत त्यांच्या मृदंग वादनाची साथ लाभली आहे. मांजरा काठावरच्या शेतकऱ्याच्या पोराची ही भरारी चांगलीच कौतुकाचा विषय ठरली आहे.

काळाच्या ओघात भारतीय प्राचीन वाद्ये मागे पडत असताना तालुक्यातील आवाड शिरपुरा येथील सुपुत्र प्रताप आवाड यांनी ‘पखवाज’ अथवा ‘मृदंग’ या पारंपरिक वाद्यावर आपल्या बोटांची जादू निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याचं पोर असलेल्या प्रताप यांनी पुढे आपल्या कलेचा सातासमुद्रापार झेंडा फडकवला आहे. तपोवनचे सुभाष महाराज देशमुख, पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या गुरूकुलात पखवाजवादक उध्दवबापू आपेगावकर, गोपाळ जाधव, पुणे येथे वसंतराव घोरपडकर, अरविंदकुमार आझाद, ध्रुपदगायक पंडित उदय भवाळकर अशा थोर पखवाजवादक गुरूंच्या सान्निध्यात तब्बल दोन दशकं साधना केलेल्या प्रताप आवाड यांनी यापूर्वी जवळपास १६ देशांत प्रवास करत आपले मृदंगवादन सादर केले आहे.

यात देश-विदेशातील नामवंतांच्या समवेत अमेरिका ते आफ्रिकन देश असे पंचवीसपेक्षा जास्त विदेशदौरे केले आहेत. विदेशात शंभरावर तर देशात चारशेवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यक्रमात पखवाजवादन सादर केले आहे. अशा या हरहुन्नरी कलाकारासाठी शुक्रवारचा दिवस तसा करिअरमधील 'ब्लॉकब्लास्टर फ्रायडे' ठरला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनानंतरच्या पहिल्या बांग्लादेशच्या विदेश दौऱ्यात प्रताप आवाड यांना स्थान मिळाले असून, बांग्लादेशची राजधानी ढाका येथे साजरा करण्यात आलेल्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिन व राष्ट्रपती शेख मुजीबुर्रहमान यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात पद्मभूषण अजय चक्रबर्ती यांच्यासमवेत मृदंगवादन सादर करण्याची संधी मिळाली आहे.

चौकट...

दोन देशांच्या पंतप्रधानासमोर कलेचं सादरीकरण

बांग्लादेश येथील राष्ट्रीय समारोहामध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासमोर निमंत्रित कलाकार म्हणून पद्मभूषण पंडित अजय चक्रबर्ती यांच्यासमवेत मृदंगाची साथ प्रताप आवाड यांनी दिली. यावेळी तबला शोमेन सरकार यांनी तर की बोर्डसाठी तन्मय चटर्जी यांची साथ होती. भारत सरकारच्या ‘इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन’ यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यात हा कार्यक्रम आयोजित केला होता.

मैत्रीचा खास राग आळवला

बांग्लादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेल्या पंतप्रधानांच्या विशेष दौऱ्यात स्थान मिळाल्याचा प्रताप आवाड यांना मोठा आनंद आहे. याचे तालुक्यात कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्यात पद्मभूषण अजय चक्रबर्ती यांनी दोन्ही देशांच्या मैत्रिपूर्ण संबंधाचे औचित्य साधत विशेष अशा ‘मैत्री’ या नव्या रागाची रचना सादर केली. यास साथ दिली ती प्रताप आवाड यांच्या मृदंगवादनाने. प्रताप यांच्या मृदंगाचा नाद अन् थाप बांग्लादेशच्या राजधानीत घुमल्याने तालुक्यातील एका कलाकाराने प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानाच्या शासकीय दौऱ्यात सहभागी होण्याचा मान मिळविला आहे.