साेसाट्याच्या वाऱ्याने ज्वारीचे पीक आडवे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:19 IST2021-02-05T08:19:44+5:302021-02-05T08:19:44+5:30

कीडराेगही पाठ साेडेना -ज्वारीउत्पादक शेतकरी अडचणीत बाबू खामकर पाथरुड (जि. उस्मानाबाद) : ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या भूम ...

The sorghum crop is lying in the wind ... | साेसाट्याच्या वाऱ्याने ज्वारीचे पीक आडवे...

साेसाट्याच्या वाऱ्याने ज्वारीचे पीक आडवे...

कीडराेगही पाठ साेडेना -ज्वारीउत्पादक शेतकरी अडचणीत

बाबू खामकर

पाथरुड (जि. उस्मानाबाद) : ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या भूम तालुक्यातील पाथरुड परिसरातील हे पीक साेसाट्याच्या वाऱ्यामुळे अक्षरशः आडवे झाले आहे. त्यातच कीडराेगही पाठ साेडण्याचे नाव घेत नसल्याने ज्वारीउत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

कधी दुष्काळ, तर कधी गारपीट. या संकटांशी दाेन हात करीत शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी उरकली. चांगल्या पर्जन्यमानामुळे पाथरूड परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी ज्वारीच्या पिकावर भर दिला आहे. हे पीक जाेमदार आले आहे. या पिकावर चिकटा या राेगाचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. असे असतानाच मागील चार-पाच दिवसांपासून विशेषकरून पहाटेच्या सुमारास साेसाट्याचा वारा सुरू आहे. या वाऱ्यामुळे हुर्ड्यात आलेले ज्वारीचे पीक आडवे झाले आहे. हाताताेंडाशी आलेला हा घास हिरावला जाऊ लागल्याने शेतकरी जास्तीच्या संकटात सापडले आहेत.

चाैकट...

सध्या ज्वारीचे पीक आठ ते दहा फुटांपर्यंत उंच वाढले आहे. कणसे हुर्डा ते दाणे पक्वतेच्या अवस्थेत आहेत. परंतु अशा परिस्थितीत वाऱ्याने ज्वारीची ताटे मोडून पडत असल्याने कणसास दाणे भरत नाहीत. परिणामी कडब्यासह ज्वारीचे माेठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

वाऱ्याने आठ ते दहा फुटांपर्यंत वाढलेली ज्वारी आडवी झाली आहे. त्यामुळे उत्पादनात माेठी घट येईल. - बाळासाहेब वनवे, आनंदवाडी.

कीडरोगाच्या संकटातून कसेबसे ज्वारीचे पीक तगले असतानाच वाऱ्याने सुमारे दोन एकर ज्वारीचे पीक जमीनदोस्त केले आहे. हे नुकसान न भरून येणारे आहे.

- यादव खामकर, आनंदवाडी

ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेतच वाऱ्याने सुमारे दीड एकर क्षेत्रावरील ज्वारी पडल्याने ज्वारीसह कडब्याचे अतोनात नुकसान झाले आहे.

- ईश्वर खामकर, आनंदवाडी.

Web Title: The sorghum crop is lying in the wind ...