परंड्यात शिवसंपर्क अभियान बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST2021-07-13T04:07:41+5:302021-07-13T04:07:41+5:30
परंडा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गौतम लटके यांनी तालुक्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ...

परंड्यात शिवसंपर्क अभियान बैठक
परंडा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गौतम लटके यांनी तालुक्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी काम करण्याचे आदेश दिले. शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा, युती किंवा आघाडीची चिंता करू नका, असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना केल्याचे गौतम लटके यांनी या बैठकीतून सांगितले.
येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात या शिवसंपर्क अभियान बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव यांची भाषणे झाली. १२ ते २४ जुलै या काळात शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीस शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड, युवा शहरप्रमुख वैभव पवार, नगरसेवक रत्नकांत शिंदे, पं.स. सभापती प्रतिनिधी सतीश दैन, उपसभापती प्रतिनिधी पोपट चोबे, माजी उपनगराध्यक्ष श्याम मोरे, शिवसेना तालुका उपप्रमुख शुक्राचार्य ढोरे, बळीराम गवारे, शिवाजी कासारे, माजी शहरप्रमुख दत्ता रणभोर, आप्पा गोडगे, शाहू खैरे, ब्रह्मदेव भोळे, विजय नवले, विनोद जगताप, ज्योतीराम घोगरे, सतीश मेहेर, गणेश जेकटे आदी उपस्थित होते.