पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिंदे बिनविराेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST2021-07-24T04:19:56+5:302021-07-24T04:19:56+5:30

प्रत्येक सदस्याला संधी मिळावी, यासाठी पक्षाकडून फाॅर्म्युला निश्चित करण्यात आला हाेता. या फाॅर्म्युल्यानुसार भाजपाचे शरद जमदाडे यांनी त्यांचा कार्यकाळ ...

Shinde unopposed as Deputy Chairman of Panchayat Samiti | पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिंदे बिनविराेध

पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिंदे बिनविराेध

प्रत्येक सदस्याला संधी मिळावी, यासाठी पक्षाकडून फाॅर्म्युला निश्चित करण्यात आला हाेता. या फाॅर्म्युल्यानुसार भाजपाचे शरद जमदाडे यांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा दिल्याने त्यांची जागा रिक्त झाली होती. नूतन उपसभापती निवडीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभा बाेलावण्यात आली हाेती. पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या उपस्थितीत सभेला सुरुवात झाली असता, दत्ता शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविराेध निवड घाेषित करण्यात आली. निवडीनंतर उपसभापती शिंदे यांचा भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष बापू कणे, सभापती रेणुका इंगोले, पंचायत समिती सदस्य शरद जमदाडे, चित्तरंजन सरडे, नगरसेवक सचिन पाटील, यशवंत लोंढे,आनंद कंदले यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी नवनिर्वाचित उपसभापती दत्तात्रय शिंदे यांचा सत्कार करताना सभापती रेणुका इंगोले,माजी उपसभापती शरद जमादाडे,तालुकाध्यक्ष संतोष बोबडे,युवा नेते विनोद गंगणे सह आदी उपस्थित होते.

Web Title: Shinde unopposed as Deputy Chairman of Panchayat Samiti