शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

पारगावात पुन्हा वाढतोय कोरोना संसर्गाचा धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:32 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे जुलै महिन्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून, सध्या ११ बाधित रुग्ण आहेत. ...

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे जुलै महिन्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून, सध्या ११ बाधित रुग्ण आहेत. असे असताना नागरिकांकडून मात्र संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने नियम पाळण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

येथील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आजपर्यंत आढळून आलेल्या बाधितांची संख्या १४० इतकी झाली आहे. जून महिन्याच्या शेवटी येथील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या शून्यावर आली होती. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शिवाय, रुग्ण नसले तरी व्यापारी व नागरिकांकडून नियमांचे काटेकोर पालन केले जात होते; परंतु मागील काही दिवसांत नागरिक पुन्हा बेफिकीर झाल्याचे दिसत आहेत. परिणामी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा कोरोना रुग्ण आढळून येत आहे. जुलै महिन्यात येथे १७ रुग्ण आढळले असून, या सर्वांवर वाशी येथील कोविड विलगीकरण कक्षात उपचार करण्यात आले. सध्या ११ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्या तुलनेत तपासणीसाठी नागरिकांचा सहभागदेखील अत्यल्प असून, विनामास्क फिरणाऱ्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.