मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:26 IST2021-01-14T04:26:49+5:302021-01-14T04:26:49+5:30
या निवडणुकीत महाविकास आघाडी व संजय गाढवे पॅनलमध्ये थेट दुरंगी सामना रंगला आहे. यामध्ये महाविकास आघाडी पॅनलमधील काँग्रेसचे ज्येष्ठ ...

मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत महाविकास आघाडी व संजय गाढवे पॅनलमध्ये थेट दुरंगी सामना रंगला आहे. यामध्ये महाविकास आघाडी पॅनलमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.तानाजी बोराडे, राष्ट्रवादीचे संजय बोराडे, माजी बाजार समिती सभापती बलभीम भसाड, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष विजय बोराडे, जिल्हा परिषद सदस्य संगीता बोराडे, शिवसेनेचे वैजीनाथ म्हमाणे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख चेतन बोराडे, तसेच भाजप पुरस्कृत संजय गाढवे पॅनलमधील पंचायत समिती माजी उपसभापती रामकिसन गव्हाणे, भाजपचे तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, माजी सरपंच बापू तिकटे या तालुका स्तरावर आपले राजकीय वजन वापरणाऱ्या आजी माजी व विद्यमान नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली असून, सर्वच जण कंबर कसून मतदारांची मनधरणी करताना दिसत आहेत.
गृहभेटींवर भर
भूम तालुक्यातील ईटनंतरची मोठी आणि राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पाथरुड ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. उमेदवारांसह नेतेमंडळी, कार्यकर्ते आपलाच उमेदवार निवडून यावा, यासाठी जिवाचे रान करीत असून, घरोघरी जाऊन मतदानासाठी विनवणी सुरू असल्याचे चित्र आहे.