कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्हा रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST2021-07-11T04:22:52+5:302021-07-11T04:22:52+5:30
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट धडकली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा रुग्णालयातील हर्निया, अस्थी, कान-नाक-घसा, मोतीबिंदू, अपेडिक्स ...

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्हा रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया सुरू
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट धडकली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा रुग्णालयातील हर्निया, अस्थी, कान-नाक-घसा, मोतीबिंदू, अपेडिक्स अशा आजाराच्या शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. अपघातानंतर गुंतागुतीची शस्त्रक्रिया तसेच अपेंडिक्सचा अधिक त्रास असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया मात्र केल्या जात होत्या. कोरोना संसर्गाचा कहर सुरू असल्याने प्रवासातील गर्दीस रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमुळे कोरोना संसर्गाची भीती अनेकांच्या मनात होती. त्यामुळे काही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी प्रतीक्षा करणेच पसंत केले होते. जुलै महिन्यापासून नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. शस्त्रक्रिया सुरू झाल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना दिलासा मिळाला.
पॉईंटर...
शासकीय रुग्णालयात सध्या कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू
६०
शासकीय रुग्णालयात सध्या रिकामे बेड्स
३४३
कोणत्या रुग्णालयात कोणत्या शस्त्रक्रिया सुरू
जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागात डोळ्याच्या शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत.
हर्निया, अपेंडिक्स, अस्थी, कान-नाक-घसा, पोटाच्या शस्त्रक्रिया होत आहेत.
जिल्हा स्त्री रुग्णालयात नियमित प्रसूती तसेच सिझेरियनच्या शस्त्रक्रिया होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयाची ओपीडी निरंतर सुरू
जिल्हा रुग्णालयातील नवीन इमारतीत कोरेाना बाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. तर नॉन कोविड रुग्णांवर जुन्या इमारतीत उपचार सुरू होते.
जुन्या इमारतीत कोरोना काळातही ओपीडी निरंतर सुरू आहे. व्हायरल फिव्हर, टायफाईड, खोकला, सर्दी अशा आजारासह अन्य आजाराचे रुग्ण उपचारास येत होते. सध्या ओपीडी व आयपीडीची संख्या वाढली आहे.
प्रतिक्रिया...
शस्त्रक्रिया सुरू झाल्याने दिलासा
वर्षरापासून अपेंडिक्सचा त्रास जाणवत आहे. मात्र या कालावधीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने औषध गोळ्या घेऊन उपचार घेत होतो. त्रास वाढल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो. गुरुवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया सुरू झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
जालिंदर नळेगावकर, रुग्ण
सहा महिन्यांनंतर मुहूर्त
हर्नियाच्या आजाराने मागील सहा महिन्यांपासून त्रस्त होतो. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे काही दिवस आजार अंगावर काढला. त्यानंतर तीन महिने शस्त्रक्रिया बंद होत्या. शस्त्रक्रिया सुरु झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झालो. शनिवारी हर्नियाची शस्त्रक्रिया झाली आहे. रुग्णालयात कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
भारत पवार, रुग्ण
कोट...
मागील पंधरा दिवसापासून जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरु झाल्या आहेत. सध्या हर्निया, कान-नाक-घसा, अस्थी, पोटाच्या, डोळ्याच्या तसेच अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेचा समावेश आहे. आठवड्यात ३० ते ३५ शस्त्रक्रिया पार पडत आहेत. कोरोना काळात आंतररुग्ण विभागात ५० रुग्ण उपचासाठी दाखल असत, सध्या आंतररुग्ण विभागात दीडशेच्या वर रुग्ण उपचार घेत आहेत.
डॉ. सचिन देशमुख,
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
गरिबांवर कोरोनाशिवाय इतर उपचार झाले कोठे
जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही जिल्हा रुग्णालयात ओपीडी आयपीडी कक्ष सुरूच होते.
उपजिल्हा रुग्णालयातही कोरोनासह इतरही आजारावर उपचार सुरू होते. त्याचा फायदा गरिबांना झाला.