पदाधिकाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST2021-02-15T04:28:25+5:302021-02-15T04:28:25+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील तावरजखेडा ग्रा. पं. च्या नूतन सदस्यांचा सत्कार पुणे येथील जयशंकर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. यावेळी डॉ. ...

पदाधिकाऱ्यांचा सत्कार
उस्मानाबाद : तालुक्यातील तावरजखेडा ग्रा. पं. च्या नूतन सदस्यांचा सत्कार पुणे येथील जयशंकर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. यावेळी डॉ. विनोद पोतदार, ॲ. राजेंद्र फेरे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पप्पाजी पुराणिक यांची उपस्थिती होती.
सरपंचपद पाचभाई
येरमाळा : वाणेवाडी ग्रा. पं. च्या सरपंचपदी विक्रम पाचभाई तर उपसरपंचपदी नीलेश उबाळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर जिल्हा बँकेचे संचालक विकास बारकूल यांनी त्यांचा सत्कार केला.
निवडी बिनविरोध
कळंब : तालुक्यातील सापनाई ग्रा. पं. च्या सरपंचपदी विभावती बाराते तर उपसरपंचपदी ॲड. विष्णू डोके यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून कनिष्ठ अभियंता ए. बी. मडगे यांनी काम पाहिले.
अळीचा प्रादुर्भाव
(फोटो घेणे)
कळंब : मागील काही दिवसांपासून होत असलेल्या वातावरणातील बदलाचा फटका हरभरा पिकाला बसत आहे. काही भागात या पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून, यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
एकाविरुद्ध गुन्हा
मुरूम : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने १२ फेब्रुवारी रोजी अचलेर येथे छापा टाकला. यावेळी महेश सोमवंशी हा कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख ५१० रुपयांसह मिळून आला. याप्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्षपदी कदम
तुळजापूर : राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राजरत्न कदम, विधानसभा अध्यक्ष दत्ता कांबळे, तसेंच तुळजापूर तालुकाध्यक्षपदी विनोद जाधव, उपाध्यक्षपदी समाधान रोकडे, सरचिटणीस समाधान धाकतोडे, शहराध्यक्षपदी आकाश शिंदे व उपाध्यक्ष पदी किरण कांबळे, बालाजी कांबळे यांच्या निवडी करण्यात आल्या. प्रदेश सरचिटणीस अशोक जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या हस्ते या सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
शिवजयंती उत्सव नियोजनाची बैठक
तामलवाडी : शिवजयंती उत्सवानिमित्त येथील पोलीस ठाण्यांतर्गत गावातील जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलिस पाटील यांची बैठक पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सपोनि सचिन पंडित यांनी केले. यावेळी पं. स. सदस्य दत्तात्रय शिंदे, डॉ. रविकांत गुरव, आप्पुराजे गवळी, हनमंत गवळी, आनंदा रणसुरे, प्रवीण कुंभार, महेश रोकडे, आकाश सुरनूर आदी उपस्थित होते.
शालेय समितीच्या अध्यक्षपदी गवळी
तुळजापूर : तालुक्यातील आरळी (बु) जि. प. शाळेच्या शालेय समिती अध्यक्षपदी संजय गवळी तर उपाध्यक्षपदी प्रवीण कदम यांची बिनविरोध निवड झाली. समितीत सदस्य म्हणून सम्राट पारवे, नागेश तानवडे, बाळासाहेब दरेकर, अंजली बामनकर, आशा बनसोडे, अश्विनी व्हरकट, नसिबा शेख, सारिका पारवे, इरफाना पिरजादे, सचिवपदी मुख्याध्यापक दीपक सोनवणे तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून गौतम राठोड यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच गोविंद पारवे, उपसरपंच किरण व्हरकट, संजय पारवे, भास्कर व्हरकट, लक्ष्मण कचरे, संजय घोडके, मकरंद बामणकर, गोरख पारवे, संदेश माने आदी उपस्थित होते.
शिवजयंती उत्सवास मागितली परवानगी
उमरगा : शिवजयंती महोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी विश्व मराठा संघ उमरगा-लोहारा तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार संजय पवार यांच्याद्वारे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी विश्व मराठा संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख बाबा पवार, उमरगा शहराध्यक्ष मंगेश भोसले, ओम जगताप, सागर भोसले अभिषेक वडदरे, अनिकेत साठे, ज्ञानेश्वर जाधव, शंकर जाधव, आकाश कुंभार, मिथेश राखेलकर, स्वप्नील झाडे, विनोद बोडके, पवन भोसले, सागर बनसोडे आदी उपस्थित होते.
आनंद कंदले यांची सदस्यपदी नियुक्ती
(सिंगल फोटो : अजीत चंदनशिवे १४)
तुळजापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीवर आमदार नामनिर्देशित सदस्य म्हणून आनंद कंदले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयास याबाबतचे पत्र दिले. त्यानुसार वैद्यकीय अधीक्षक डॉ. बोडके हे पत्र कंदले यांना दिले. या रुग्ण कल्याण समितीत उपविभागीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी आदींचा समावेश आहे.
सरपंचपदी कांबळे, मोरे उपसरपंच
उमरगा : तालुक्यातील सांगवी, शाहूनगर, पारसखेडा ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सोनम विकास कांबळे तर उपसरपंचपदी सुनीता धनराज मोरे यांची निवड झाली. यावेळी सरपंच, उपसरपंचांसह फुलाबाई गावडे, संगीता गायकवाड, गुलाब पाटील, सुभाष गावडे, किसन वाकळे या सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी पी. एस. चव्हाण उपस्थित होते.
तालुकाध्यक्षपदी विनोद जाधव
(सिंगल फोटो : अजित चंदनशिवे १४)
तुळजापूर : राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी तीर्थ (खु) येथील विनोद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. रा. प. महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे व जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, विधानसभा अध्यक्ष गोकूळ शिंदे, युवक अध्यक्ष संदीप गंगणे, दिलीप पाटील, दुर्गेश साळुंके, गणेश ननावरे, चंद्रकांत डावरे, शरद जगदाळे आदी उपस्थित होते.
शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
पाथरुड : १९ फेब्रुवारी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त पाथरूड येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यानिमित्त १७ फेब्रुवारी रोजी समाजप्रबोधनकार पुरुषोत्तम महाराज यांचे कीर्तन, १८ रोजी रक्तदान शिबिर व परिसरातील नागरिकांसाठी नेत्ररोग तपासणी व मोफत चष्मे वाटप, सावता केशव फुले महाराज यांचे भारुड असे कार्यक्रम होणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांचा पालखी सोहळा, शालेय विद्यार्थ्यांची शिव विचार व शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन तर २० रोजी पारंपरिक मिरवणूक सोहळा होणार आहे.