एकनाथ लोमटे महाराजांकडून महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 15:23 IST2022-07-30T15:23:07+5:302022-07-30T15:23:40+5:30

गुरुवारची गर्दी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात होते. त्यांचे जेवण सुरू असल्याने ही महिला एका झाडाखालील ओट्यावर बसली

Rape of woman by Eknath Lomte Maharaj; Filed a case | एकनाथ लोमटे महाराजांकडून महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

एकनाथ लोमटे महाराजांकडून महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

कळंब (जि. उस्मानाबाद) : दर्शनासाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा महाराजांनीच विनयभंग केल्याची घटना गुरुवारी दुपारी मलकापूरच्या मठात घडली आहे. याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी पहाटे आरोपी महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
बीड जिल्ह्यातील एक ३५ वर्षीय महिला उस्मानाबाद जिल्ह्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजांची भक्त होती. २८ जुलै रोजी ती एकटीच मलकापूर येथील मठात दर्शनासाठी गेली. 

गुरुवारची गर्दी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात होते. त्यांचे जेवण सुरू असल्याने ही महिला एका झाडाखालील ओट्यावर बसली. तेव्हा एकनाथ महाराजांच्या शिष्याने तिच्याजवळ येऊन महाराजांनी खोलीत बोलविल्याचे सांगितले. आत गेल्यानंतर महाराजांनी शरीरसंबंध ठेवावे लागतील, असे सांगितले. यास विरोध केल्यानंतर झोंबाझोंबी व मारहाण करीत त्यांनी महिलेचा विनयभंग केला. आरडाओरडा केल्यामुळे शिष्याने दार उघडले. यावेळी मारहाण करून गळा दाबण्याचा प्रयत्नही महाराजाने केल्याची तक्रार महिलेने येरमाळा पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एकनाथ महाराजावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

महाराजांचा शोध सुरू...
पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर लागलीच गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महाराज सध्या फरार झाले असून, पोलिसांचे एक पथक त्यांचा माग काढत असल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक जी. पी. पुजरवाड यांनी सांगितले.

कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी...
पीडित महिला दर्शनासाठी खोलीत गेल्यानंतर एकनाथ महाराजांनी या महिलेस शरीरसंबंधाची विचारणा केली. त्यास नकार दिल्यानंतर महाराजांनी मागच्या वेळी पेढा खायला दिल्यानंतर तू झोपली होती, तेव्हा आपण तुझ्यावर बलात्कार व त्याचा व्हिडीओही तयार केल्याचे सांगितले. हाच कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी महाराजाने दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
 

Web Title: Rape of woman by Eknath Lomte Maharaj; Filed a case