पारगावातील नालीचा प्रश्न दहा वर्षानंतर मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST2021-07-11T04:22:50+5:302021-07-11T04:22:50+5:30

येथील रुई रस्त्यालगत नालीचे बांधकाम नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. येथील नागरिकांची अडचण ...

The problem of drainage in Pargaon was solved after ten years | पारगावातील नालीचा प्रश्न दहा वर्षानंतर मार्गी

पारगावातील नालीचा प्रश्न दहा वर्षानंतर मार्गी

येथील रुई रस्त्यालगत नालीचे बांधकाम नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. येथील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून आता नाली बांधकामाला सुरुवात केली आहे. यासाठी जेसीबी मशीनच्या साहाय्याने या ठिकाणी खोदकाम करण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत या नालीचे काम पूर्ण होणार आहे.

दरम्यान, या ठिकाणी नाली नसल्याने नागरिकांच्या सतत तक्रारी होत्या. गेली कित्येक वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता. घाणीच्या साम्राज्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने हे काम हाती घेतले आहे. वास्तविक १५व्या वित्त आयोगातील निधीपेक्षाही या कामाला अधिक खर्च येणार आहे. यासाठी ग्रामनिधीमधून काही मदत घेतली जाणार असल्याचे उपसरपंच पंकज चव्हाण यांनी सांगितले.

090721\1636img_20210709_115836.jpg

नाली बांधकाम

Web Title: The problem of drainage in Pargaon was solved after ten years