उस्मानाबादमध्ये दुचाकी अपघातात पोलीस हवालदाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 18:37 IST2019-01-07T18:36:42+5:302019-01-07T18:37:07+5:30
उजळणी कोर्स करून पोलीस ठाण्याकडे परतणाऱ्या एका पोलीस हवालदाराचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला़

उस्मानाबादमध्ये दुचाकी अपघातात पोलीस हवालदाराचा मृत्यू
उस्मानाबाद : पोलीस मुख्यालयातील उजळणी कोर्स करून पोलीस ठाण्याकडे परतणाऱ्या एका पोलीस हवालदाराचा दुचाकी अपघातातमृत्यू झाला़ ही घटना सोमवारी सकाळी औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंगोली नजीक घडली़
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सुनिल भगवानराव सावंत (वय-४४ रा़ नळेगाव ता़ चाकूर जि़ लातूर) हे उजळणी कोर्ससाठी पोलीस मुख्यालयात आले होते़ मुख्यालयातील कोर्स संपल्यानंतर सोमवारी सकाळी दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२४- ए़ के़५३७६) ढोकीकडे जात होते़ ही दुचाकी शिंगोली नजीक आली असता ट्रॅक्टरशी जोराची धडक झाली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनिल सावंत यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र, त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत आनंदनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती़