जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते चित्ररथास झाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST2021-07-14T04:37:37+5:302021-07-14T04:37:37+5:30

उस्मानाबाद : प्रशासनाच्या वतीने चित्ररथ व एलईडी व्हॅनद्वारे सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रचार करण्यात येत असून, ...

The painting was started by the Collector | जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते चित्ररथास झाला प्रारंभ

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते चित्ररथास झाला प्रारंभ

उस्मानाबाद : प्रशासनाच्या वतीने चित्ररथ व एलईडी व्हॅनद्वारे सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रचार करण्यात येत असून, याची सुरुवात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केली.

हा चित्ररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात २० दिवस विविध गावांना भेटी देऊन तेथे थांबून माहिती देणार आहे. दररोज किमान ६० ते ७० किमींचा प्रवास करुन प्रतिदिन तीन याप्रमाणे साठ गावांना भेटी देण्यात येणार आहेत. एलईडी व्हॅन जिल्ह्यातील ६६ गावांमध्ये जाणार आहे. दररोज दोन-तीन गावांमध्ये जाऊन माहिती देण्याचे काम करण्यात येणार आहे. या चित्ररथ व एलईडी वाहनातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची पुस्तिका व पोष्टर ठेवण्यात आले आहेत. त्याचे वितरणही करण्यात येणार आहे.

येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उद्‌घाटन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बी. जी. अरवत, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे आदी उपस्थित होते.

चौकट....

कोरोना नियमांचे पालन करावे

या चित्ररथांवर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे फ्लेक्स लावण्यात आले असून एलईडी व्हॅनवरही योजनांची माहिती फ्लेक्सद्वारे दाखवण्यात आली आहे. एलईडी व्हॅनवर दृकश्राव्य माध्यमांचा वापर करूनही योजनांची माहिती दिली जाणार आहे. या चित्ररथ व एलईडी व्हॅनवरील माहिती घेताना किंवा पाहताना नागरिकांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

Web Title: The painting was started by the Collector