देश समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्यांच्याच नशिबी येताेय फाशीचा दाेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST2021-02-08T04:28:35+5:302021-02-08T04:28:35+5:30
शेतकरी माेळावा -रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केली खंत वाशी : अन्नधान्य पिकवून देशाला समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्यांच्याच नशिबी फाशीचा दाेर ...

देश समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्यांच्याच नशिबी येताेय फाशीचा दाेर
शेतकरी माेळावा -रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केली खंत
वाशी : अन्नधान्य पिकवून देशाला समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्यांच्याच नशिबी फाशीचा दाेर येत असल्याची खंत शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केली.
वाशी येथे ७ फेब्रुवारी राेजी घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बाेलत हाेते. व्यासपीठावर दादासाहेब चेडे, कालिदास आपेट, संघटनेचे युवा आघाडीचे अध्यक्ष रामेश्वर गाडे, तात्यासाहेब रोडे, अशोकराव खलाटे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग मारवाडकर, शिवाजी नांदखिळे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत भराटे, राधाकिशन गडदे, सुनील चेडे, भास्करराव कवडे, वसंतराव कवडे, बबनराव परंडकर, सीताराम पवार यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतीमालास हमीभाव मिळत नाही. त्यामुळे उत्पादन खर्चाएवढाही दर शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. कायद्यानुसार शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे. मात्र, यावर काेणीही बाेलत नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलावे लागत आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे दाेन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विराेधात आंदाेलन सुरू आहे. या आंदाेलनाला आमचाही पाठिंबा आहे. परंतु, केंद्रातील उद्याेगपती धार्जिने सरकार शेतकऱ्यांचा आवाज ऐकायला राजी नाही. उलट दडपशाही केली जात आहे. सरकारने असेच ताणून धरल्यास आंदाेलन आणखी तीव्र हाेऊ शकते, असेही ते म्हणाले. मेळाव्यास परिसरातील शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. दादासाहेब चेडे यांनी प्रास्ताविक केले. एस. बी. छबीले, एस. एस. धारकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. शहाजी चेडे यांनी आभार मानले.