उस्मानाबादेत टमटम-ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:57 IST2018-12-07T16:55:25+5:302018-12-07T16:57:00+5:30
या अपघातात टमटममधील एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

उस्मानाबादेत टमटम-ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार
उस्मानाबाद : तालुक्यातील वाणेवाडी-दारफळ मार्गावर गुरूवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास टमटम आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात टमटममधील एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरूवारी रात्री तेरहून दारफळ-वाणवोडी मार्गे ट्रॅक्टर (क्र.एमएच.२५, एएल.२६१५) चिखलीकडे निघाला होता. साधारणपणे रात्री दहा वाजेच्या सुमारास हा ट्रॅक्टर दारफळपाटीनजीक आला असता, समोरून येणाऱ्या टमटमसोबत (क्र.एमएच.२५, आर.७४२३) जोराची धडक झाली.
या अपघातात टमटममध्ये बसलेले दत्ता काशिनाथ पवार (वय ४०, रा. तेर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टमटमचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. तर ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवून मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून ट्रॅक्टरचालकाविरूद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार गणपत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अमंलदार प्रकाश राठोड करीत आहेत.