शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत विनयभंग प्रकरणी एकास कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:15 IST

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एक महिना सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ ही घटना कळंब तालुक्यातील घारगाव येथे घडली होती़

उस्मानाबाद : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एक महिना सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ ही घटना कळंब तालुक्यातील घारगाव येथे घडली होती़

याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी दिलेली माहिती अशी की, कळंब तालुक्यातील घारगाव येथील चुलत सासºयाच्या घरी एक महिला कुटुंबासह राहत होती़ महिलेचा पती व परमेश्वर बंकटराव पवार (रा़ नांदगाव ता़अंबाजोगाई ह़मु़घारगाव) यांची ओळख झाली़ परमेश्वर पवार सतत त्यांच्या घरी येत होता़ तीन वर्षापूर्वी पीडित महिला घरात काम करीत असताना पाठीमागून आलेल्या पवार याने तिच्यावर जबरी अत्याचार केला़ ही घटना कोणास सांगितली तर मुलांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली़ तसेच शेताकडे जात असताना पाठलाग करून मारहाण केल्याची फिर्याद पीडित महिलेने १२ सप्टेंबर २०१७ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात दिली होती़ पीडितेच्या फिर्यादीवरून परमेश्वर बंकटराव पवार विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ 

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते़ या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ए़ए़आऱऔटी यांच्या समोर झाली़ या प्रकरणात सरकार पक्षाकडून अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी चार साक्षीदार तपासले़ या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व अ‍ॅड़महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी परमेश्वर पवार याला भादंवि कलम ३५४ ड प्रमाणे दोषी धरून एक महिना सक्तमजुरी, पाच हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन आठवडे सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली़

महिलेकडून खोटी साक्षया प्रकरणात आरोपीतर्फे पीडित महिलेची उलटतपास घेतेवेळी तिने आरोपीस मदत होईल, अशी साक्ष दिली़ त्यामुळे पीडित फिर्यादी महिलेस न्यायालयाने नोटीस दिली होती़ या नोटीसीच्या उत्तरात पीडित महिलेने तिची चूक झाल्याचे कबूल केले़ न्यायालयाने खोटी साक्ष दिल्यामुळे पीडित महिलेस दोषी ग्राह्य धरून तिला ताकिद देऊन सोडून दिल्याचे अ‍ॅड़ देशमुख यांनी सांगितले़.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयOsmanabadउस्मानाबाद