तुळजापुरात भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 18:08 IST2019-01-05T18:06:59+5:302019-01-05T18:08:18+5:30
ट्रॅक्टर चालकाविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळजापुरात भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू
तुळजापूर ( उस्मानाबाद ) : भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला़ ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास मंगरूळ - तुळजापूर मार्गावर घडली़ या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील हानुमंत भगवान भोसले हे शनिवारी पहाटेच्या सुमारास मंगरूळ- तुळजापूर मार्गावरून जात होते़ मंगरूळ घाटात भरधाव आलेल्या ट्रॅक्टरने (क्ऱएम़एच़२५- एच़७३३३) जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या हनुमंत भोसले यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रभाकर श्रीपती भोसले (राग़ंधोरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक व्यंकट मारूती माने (रा़ पाडोळी आ़) याच्याविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.