शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
2
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
3
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
5
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
6
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
7
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
8
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
9
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
10
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
11
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
12
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
13
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
14
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
15
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
16
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
17
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
18
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
19
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
20
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
Daily Top 2Weekly Top 5

आता आषाढातही शुभमंगल सावधान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST

कळंब : आषाढ महिन्यात नव्या सुनेने आपल्या खऱ्या सासू-सासऱ्याचे तोंड पाहू नये असे म्हणतात. परंतु, यंदा धडाक्यात लग्नसोहळे पार ...

कळंब : आषाढ महिन्यात नव्या सुनेने आपल्या खऱ्या सासू-सासऱ्याचे तोंड पाहू नये असे म्हणतात. परंतु, यंदा धडाक्यात लग्नसोहळे पार पडत असल्याने पारंपरिक समज-गैरसमज आता कालबाह्य होत असल्याचे चित्र समोर येते आहे.

आषाढ हा हिंदू पंचांगाप्रमाणे आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला चौथा महिना आहे. आपल्या देशातील मुख्य व्यवसाय शेती हाच असून, याच महिन्यात पावसाचे आगमन असल्याने शेतीच्या कामाची लगबगही चालू होते. त्यामुळे घरात इतर काही कार्ये केली जात नसत. परिणामी लग्न, साखरपुडा, वास्तुशांती, उपनयन संस्कार आदी कार्येही आषाढ महिन्यात करीत नाहीत. उन्हाळ्यातील प्रचंड उकाडा सहन केल्यानंतर या महिन्यात गारवा अनुभवायास मिळतो. तसेच हिंदू पुराणानुसार सर्व देवी-देवता या महिन्यात आराम करीत असतात. त्यामुळे त्यांच्या अपरोक्ष शुभकार्य करू नये, असाही एक विचारप्रवाह आहे. वैद्यकीयदृष्ट्याही आषाढातील लग्न पुढे होणाऱ्या अपत्याच्या तब्येतीसाठी चांगले नसते, असे म्हटले जाते. या सगळ्या जुन्या काळातील गोष्टी झाल्याने आता त्याला कोणी गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. यंदा आषाढातही मोठ्या प्रमाणात लग्नाचे बार उडवून दिले जात आहेत. शहरी भागाबरोबरच रूढी परंपरा सांभाळणाऱ्या ग्रामीण भागातही यंदा या मोसमात लग्ने लागल्याची उदाहरणे आहेत.

साधारणतः दिवाळीत तुळशीविवाह झाल्यानंतर सुरू झालेला विवाह सोहळ्यांचा मुहूर्त जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो. परंतु मागील दोन वर्षांपासून वाढत्या कोरोनासंसर्गाने विवाह मुहूर्त असणाऱ्या महिन्यातच नेमके शासनाने गर्दी होऊ नये म्हणून निर्बंध जारी केले होते. लग्न समारंभासाठी दोन्ही बाजूकडील मिळून ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली असल्याने ज्यांना ग्रँड विवाह सोहळे करण्याची हौस होती, त्यांनी ‘वेट अँड प्रे’ची भूमिका घेतली होती. पण, कोरोनाचे नवनवीन अवतार येत असल्याने शासनाने निर्बंध कायम ठेवल्याने उरकून घ्या असा सूर दोन्ही बाजूने व्यक्त होऊ लागला. परिणामी तिथी मुहूर्त यांना फाटा देत यंदा आषाढातही सनई चौघडे वाजत आहेत.

चौकट -

परवानगी पन्नासची पण...

लग्न हा आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय सोहळा व्हावा, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी अगदी मनमोकळेपणाने खर्च करणारे कमी नाहीत. या आनंदात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, अशीही अनेकांची इच्छा असते. आता शासनाने लग्न करा, पण ५० जणांच्या उपस्थितीत, असा आदेश काढला आहे. परंतु, ही संख्या कितीही आटोपती घेतली तरी १००-१५०च्या घरात जात असल्याचे दिसत आहे.

चौकट -

आषाढ महिन्यात लग्न करू नये असे शास्त्र सांगते. याबाबत आमच्याकडे विचारणा करणाऱ्यांनाही आम्ही सांगतो की आषाढात मुहूर्त नसतात. परंतु, काही आपत्कालीन स्थिती असेल, वर अथवा वधूकडील अडचणीमुळे लग्न करावेच लागणार असेल तर कुलदैवताला अभिषेक करून, त्यांची परवानगी घेऊन लग्न लावता येते.

- ऋषिकेश पाटील, पुरोहित

आषाढात लग्न करत नाहीत. परंतु, कोरोनामुळे मागील लग्नाचे मुहूर्त सापडले नाहीत. आता परिस्थिती अशी झाली आहे की परंपरा पाळणे अवघड झाले आहे. जुन्या काळात आषाढ महिन्यात नवीन सुनेने सासू-सासऱ्याचे तोंड बघू नये, असे म्हणायचे. पण आता लग्न करून सून घरात आणली जात आहे. पंचांगामध्ये पूर्वी आषाढात लग्नाचे मुहूर्त दिले जात नव्हते. पण आता काही मुहूर्त दिले आहेत.

- मनोज जोशी, पुरोहित

चौकट

मंगल कार्यालयात लगबग वाढली

कळंब शहरातील मंगल कार्यालयात पुन्हा लग्नकार्ये होऊ लागल्याने लगबग वाढली आहे. सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, वऱ्हाडाची संख्या ५०च्या आत आहे का, यावरही मंगल कार्यालय चालकांना लक्ष ठेवावे लागत आहे. तारीख ठरवतानाच या सर्व बाबी संबंधितांना बजावून सांगितल्या जात असल्याचे मंगल कार्यालय चालकांनी सांगितले. यंदा आषाढातील जवळपास सर्व तारखा बुक असल्याची माहितीही देण्यात आली.

चौकट -आषाढातील मुहूर्त -

जुलै महिन्यातील १३, १८, २२, २५, २६, २८, २९ तर ऑगस्ट महिन्यातील ३ व ४ तारखेला लग्नाचे मुहूर्त सांगितले आहेत.