नऊशेवर ग्राहकांची वीज ताेडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:33 IST2021-02-24T04:33:54+5:302021-02-24T04:33:54+5:30
शेतक-यांत संताप -पावणेदाेन काेटी रुपये थकबाकी वसूल उस्मानाबाद : थकीत वीज बिलापाेटी वीज जाेडणी खंडित करण्याची धडक माेहीम महावितरणकडून ...

नऊशेवर ग्राहकांची वीज ताेडली
शेतक-यांत संताप -पावणेदाेन काेटी रुपये थकबाकी वसूल
उस्मानाबाद : थकीत वीज बिलापाेटी वीज जाेडणी खंडित करण्याची धडक माेहीम महावितरणकडून हाती घेण्यात आली आहे. या माेहिमेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ९०० शेतक-यांसह अन्य ग्राहकांची वीज खंडित करण्यात आली आहे. या कार्यवाहीमुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.
काेराेनामुळे शेतक-यांचे अर्थकारण ठप्प झाले आहे. उद्याेग-व्यावसायिकही अडचणीत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांची बिले मागील काही महिन्यांपासून थकीत आहेत. दरम्यान, सदरील थकीत बिलांच्या वसुलीसाठी महावितरणकडून धडक माेहीम हाती घेण्यात आली आहे. जे ग्राहक वीज बिल भरत नाहीत, त्याचे विद्युत कनेक्शन खंडित केले जाऊ लागले आहे. त्यामुळे ग्राहकांतून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. या माेहिमेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ९०० शेतक-यांसह अन्य ग्राहकांची वीज ताेडण्यात आली आहे. ही कारवाई अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया संबंधित ग्राहकांतून उमटू लागली आहे.
चाैकट..
कृषीपंप धोरणाची माहिती देण्यासाठी महावितरणचे अधिकारी-कर्मचारी विविध राजकीय, सामाजिक पदाधिकारी, शेतकरी यांच्या दारी जात आहेत. त्यांनी कृषी पंप धोरणाची माहिती देऊन चालू व थकीत वीज बिले भरण्यास प्रवृत्त करीत आहेत. या माध्यमातून ६ हजार ५७९ शेतक-यांनी १ काेटी ८१ लाख रुपये थकीत वीज बिल भरले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे वीज कंपनीकडून सांगण्यात आले.