अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST2021-07-25T04:26:46+5:302021-07-25T04:26:46+5:30

सर्व न्यायालयांत लोकअदालत उस्मानाबाद : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालत भरविण्यात येत आहे. यामध्ये भू-संपादन प्रकरणे, ...

Meeting of Superstition Eradication Committee | अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक

सर्व न्यायालयांत लोकअदालत

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालत भरविण्यात येत आहे. यामध्ये भू-संपादन प्रकरणे, मोटार अपघात तथा कामगार नुकसानभरपाई प्रकरणे, सर्व प्रकारचे दिवाणी प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, कलम १३८ एन. आय. ॲक्टप्रमाणे असलेली प्रकरणे, वादपूर्व प्रकरणे सामोपचाराने आणि तडजोडीने मिटविण्याकरिता ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिवांनी दिली आहे.

जिल्हाध्यक्षपदी नरसिंह आंबेकर

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चालक वाहतूक महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नरसिंह आंबेकर, तर उपाध्यक्षपदी रमजान मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी संजय निंबाळकर, अरविंद गोरे, नंदकुमार घेवारे, संजय दुधगावकर, खलिफा कुरेशी, प्रतापसिंह पाटील, गणेश खोचरे, मनोज मुदगल, इस्माईल मुजावर, विनोद तावडे, आकाश शहाणे, अमित भोसले, विशाल सलगर, फरीद मुजावर, अप्पा हिवरे, अनिल सोनवणे, मुसा भाई, बाबा मुजावर उपस्थित होते.

ग्रंथ दिला भेट

(फोटो : शंकर रेवते २४)

उस्मानाबाद : जिल्हा बँकेचे अधिकारी बी. एस. करड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त वाचन संस्कृती वाढण्यासाठी विजय गायकवाड यांनी त्यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा ग्रंथ भेट दिला.

Web Title: Meeting of Superstition Eradication Committee