माता रमाई जयंती तुळजापुरात साजरी
तुळजापूर : येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेला जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम यांचा हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुका कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, शहराध्यक्ष अरुण कदम, तालुकाध्यक्ष अरुण कदम, हमीद बेग, प्रताप कदम, तानाजी कदम, मच्छींद्र कदम, प्रा. अशोक कांबळे, अंकुश माने, गोपाल सोनवणे, तानाजी दवरे, किसन कदम, दत्ता लोंढे, तानजी डावारे, राम सोनवणे आदी उपस्थित होते.
महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी मोरे
सिंगल फोटो (७-२) गुणवंत जाधवर
उमरगा : शांतीदूत परिवाराच्या महिला आघाडी उस्मानाबादच्या जिल्हाध्यक्षपदी उमरगा येथील सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला मोरे यांची निवड करण्यात आली. शांतीदूत परिवार ही एक सामाजिक संघटना असून, भारतातील अनेक राज्यात व विदेशातही कार्यरत आहे. शांतीदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा विद्या जाधव यांनी ६ फेब्रुवारी रोजी पत्राद्वारे ही निवड केली आहे. महाराष्ट्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
निधी संकलनासाठी कानेगावात रामदिंडी
लोहारा : तालुक्यातील कानेगाव येथे राम मंदिर निधी संकलनासाठी रामदिंडी काढण्यात आली. यात हभप पंडित बनसोडे महाराज, हभप बाळकृष्ण महाराज, नामदेव लोभे, हरिश्चंद्र कदम, यशवंत क्षीरसागर, नागनाथ कदम, धनराज गिलडा, शिवाजी बन, रावण क्षीरसागर, लक्ष्मण बोकडे, राजेंंद्र हिडोळे, सुग्रीव भोपळे, महादेव कदम, आपाराव पाटील, बालाजी कदम, लक्ष्मण पुरी, भरत सुतार, भागवत कदम, सनातन भालकडे, अमोल भालकडे, अंगद कदम, दत्ता माळी, वामन भिसे, वसंत कदम, किसन पाटील, उत्तम कदम, वामन पाटील, पांडुरंग कदम, चंद्रकांत कदम, दशरथ क्षीरगिरे, बाळू कदम, शाहूराज तरमुडे आदी सहभागी होते.
लोहारा खुर्द येथे जनजागरण अभियान
लोहारा : अयोध्या येथील श्री राम मंदिर निर्माण व जनजागरण आणि निधी समर्पण अभियानांतर्गत लोहारा खुर्द येथे रामदिंडी काढण्यात आली. याप्रसंगी कारसेवक ज्ञानदेव पांडुरंग अरगडे, हभप मुकिंद इंगळे, शहाजी जाधव, हनुमंत रसाळ, शंकर जाधव, व्यंकटेश पोतदार, युवराज जाधव, दत्तात्रय पोतदार, हरिहर भजनी मंडळ, महिला, बालक मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी होते.
सचिवपदी कुंभार
लोहारा : आखिल विश्व वारकरी परिषदेच्या जिल्हा सचिवपदी तोरंबा येथील सोपान कुंभार यांची प्रदेशाध्यक्ष नितीन सातपुते व जिल्हाध्यक्ष हभप गुंडू भोसले महाराज रामपूरकर यांनी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
अंधाराचे साम्राज्य
उस्मानाबाद : शहरातील बँक कॉलनी भागातील बहुतांश पथदिवे बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी या भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषत: महिला व वयोवृद्ध नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
सौर दिवे बंद
उस्मानाबाद : शहरातील हातलाई परिसरात प्रशासनाने सौरदिवे बसविले होते. परंतु, सध्या यातील बहुतांश दिवे बंद पडले असून, यामुळे रात्रीच्या वेळी या भागात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. प्रशासनाने हे दिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
वाहतूक कोंडी
उस्मानाबाद : शहरातील जिल्हा न्यायालयाच्या बाजूने समर्थ नगर भागात जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा वाहने लावली जातात. यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
थंडी वाढली
ढोकी : मागील काही दिवसांपासून सकाळी आणि संध्याकाळी थंडीचा कडाका चांगलाच वाढत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरदेखील होत असून, वातावरणातील या बदलामुळे अनेकांना थंडी, ताप, सर्दी यासारखे आजार होत आहेत.