शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

Lok Sabha Election 2019 : उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीसोबत काँग्रेसकडूनही तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 5:41 PM

काँग्रेसकडून नुकत्याच जिल्हाभर पार पडलेल्या बैठका मतदारसंघ काँग्रेसला सुटण्याच्या चर्चेला बळ पुरविताना दिसून येत आहेत़

उस्मानाबाद : लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घेण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींत दोन घडामोडींनी भर पडली आहे़ भेटीगाठींनी हा विषय तापता ठेवून दिल्यामुळे मतदारसंघात सध्या वेगवेगळे तर्क-वितर्क लढविले जात आहे़ यादरम्यान, काँग्रेसकडून नुकत्याच जिल्हाभर पार पडलेल्या बैठका मतदारसंघ काँग्रेसला सुटण्याच्या चर्चेला बळ पुरविताना दिसून येत आहेत़

आघाडीत उस्मानाबाद मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे़ येथून माजी मंत्री आ़ राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे़ मात्र, गेल्या काही दिवसांपासून वेगळेच वारे वाहू लागले आहेत़ लातूर व उस्मानाबादच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिवराज पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घेण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे. यावर गेले दोन दिवस जोरदार चर्चा झडत असतानाच सोमवारी रात्री राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवराज पाटील चाकूरकरांची घेतलेली भेट व मंगळवारी दुपारी शरद पवार व राहुल गांधी यांच्यात झालेली बैठक या चर्चांना बळ पुरवित गेली.

मात्र, पाटील व चाकूरकर यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली असली तरी, उमेदवार कोणत्या का पक्षाचा असेना, मतभेद संपवून एकदिलाने काम करण्यावर जोर देण्यात आल्याचे दोन्हीकडून सांगण्यात आले आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढविण्यासंदर्भात तयारी पूर्ण केली आहे़ जिल्हाभर बैठका, मेळावे घेण्यात आले असून, आता बुथस्तरावरील कामकाज सुरु करण्यात आले आहे़ यादरम्यान, काँग्रेसनेही आता आपली तयारी सुरु केलेली आहे़ गेल्या काही दिवसांत पदाधिकाऱ्यांनी झाडून सगळ्या तालुक्यांत कार्यकर्त्यांच्या बैठका घेत सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत़ 

सोमवारीच त्यांनी जिल्हास्तरीय बैठकही घेतली आहे़ दोन्ही पक्षाकडून आपापल्या स्तरावर तयारी सुरु झाली आहे. ऐनवेळी कोणताही निर्णय झाला तरी लढण्यास आपापली सेना सज्ज राखण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु आहेत़ यासंदर्भात काँग्रेसचे आ़मधुकरराव चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आघाडीधर्म पाळण्यासाठीच बैठका सुरु असल्याचे असल्याचे सांगितले. उमेदवार कोणाचाही असला तरी दोघांकडूनही असेच काम सुरु राहील, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे आ़राणाजगजितसिंह पाटील यांनीही जागा कोणत्या पक्षाला सोडायची याचा निर्णय हे पक्षाध्यक्ष शरद पवार व राहुल गांधी हे दोघेच ठरवतील, त्यांचा आदेश प्रमाण मानून आघाडीचा धर्म पाळण्यात येईल, असे सांगितले़

सेनेचा उमेदवार आज ठरणार?एकीकडे आघाडीत जागेचा पेच फसलेला असताना सेनेत उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे़ विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना विरोध करणारा एक गट अत्यंत सक्रिय झाल्याने येथील उमेदवार निश्चिती लांबणीवर पडली आहे़ आज-उद्या करता करता एकेक दिवस मागे पडत असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत़ यानुषंगाने उमेदवारीचा निर्णय लवकरच घेण्याची हालचाल सेनेत सुरु आहे़ बुधवारी उमेदवार निश्चित होण्याची शक्यता, सेनेचे पदाधिकारी वर्तवीत आहेत़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस