शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

असमताेल पावसामुळे लाखाे हेक्टरवरील खरीप पिके धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

उस्मानाबाद - जिल्ह्यात आजवर २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. परंतु, पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच ...

उस्मानाबाद - जिल्ह्यात आजवर २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. परंतु, पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने डाेळे वटारले. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. एवढेच नाही, तर माळरानावरील काेवळ्या पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील आठ-दहा दिवसानंतर साेमवारी जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी काेसळल्या. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे; मात्र पिकांच्या जाेमदार वाढीसाठी सर्वदूर दमदार पावसाची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

जून महिना उजाडताच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. काही भागात पेरणीयाेग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरली. यानंतर अधून-मधून झालेल्या पावसामुळे खरीप पिकांची बऱ्याकी वाढ झाली. असे असतानाच मागील आठ-दहा दिवसांपासून वरूणराजाने डाेळे वटारले. परिणामी सुमारे २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके अडचणीत आली आहेत. माळरानावरील उडीद, मूग यासारखी पिके माना टाकू लागली आहेत. दरम्यान, साेमवारी दुपारी व सायंकाळच्यासुमारास जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी काेसळल्या. मात्र, हा पाऊस सर्वदूर झालेला नाही. त्यामुळे खरीप पिके जाेमदार येण्यासाठी माेठ्या व सर्वदूर पावसाची गरज शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. येत्या दाेन-तीन दिवसांत पाऊस न झाल्यास पिकांना माेठा फटका बसेल, वेळप्रसंगी दुबार पेरणी करावी लागेल, असे शेतकरी सांगताहेत.

चाैकट...

साेयाबीनचा पेरा अधिक...

जिल्ह्यात साेयाबीनचे २ लाख ४६ हजार हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र आहे. गतवर्षी साेयाबीनला मिळालेल्या उच्चांकी भावामुळे यंदाही बहुतांश शेतकऱ्यांनी साेयाबीनवरच भर दिला आहे. कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार २ लाख ९ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर साेयाबीन पेरणी झाली आहे. इतर पिकांच्या तुलनेत साेयाबीन पिकाखालील क्षेत्र काही पटीने अधिक आहे.

...तर दुबार पेरणीचे संकट

यंदा वेळेवर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे साेयाबीन उत्पादक अनेक शेतकरी उडीद, मूग यासारख्या नगदी पिकांकडे वळले. ही पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खासकरून हलक्या प्रतीच्या जमिनीवरील पिके काेमेजून चालली आहेत. आणखी तीन-चार दिवस पावसाची कृपा न झाल्यास माळरानावरील पिके पूर्णपणे वाया जातील, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. दुर्दैवाने असे झाल्यास दुबार पेरणीची नामुष्की अगाेदरच अडचणीत असलेल्या बळीराजावर येऊ शकते.

देव अशी परीक्षा दरवर्षी घेताे

१. यंदा वेळेवर पाऊस झाल्यामुळे साेयाबीनला बगल देऊन जवळपास पाच एकरावर उडीद पीक घेतले. अधुनमधून पडलेल्या पावसामुळे हे पीकही जाेमदार आले. परंतु, मागील आठ-दहा दिवसांत पावसाने दडी मारल्याने सध्या ही पिके काेमेजून चालली आहेत. त्यामुळे सध्या या पिकांसाठी माेठ्या पावसाची गरज आहे. अन्यथा पिके वाया गेली असती.

- बळीराम साेन्ने, शेतकरी.

२. खरीप पेरणीसाठीसाठी सुमारे २५ ते ३० हजार रुपये खर्च करून बी-बियाणे, खत खरेदी केले. ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली. साेयाबीन, मुगाचे पीकही जाेमदार आले. परंतु, मागील काही दिवसांपासून पाऊस झालेला नाही. त्यामुळे मुगाचे पीक काेमेजले आहे. येत्या चार-पाच दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास पिकांचे माेठे नुकसान हाेईल.

- संताेष कदम, शेतकरी.

काेट...

जिल्ह्यात आजवर एकूण १३५ मिमी पाऊस झाला आहे. या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी उरकली. पिकेही जाेमदार आली. परंतु, मागील काही दिवसांत पाऊस झालेला नाही. त्यामुळे माळरानावरील पिके माना टाकू लागली आहेत. अशा पिकांसाठी सध्या माेठ्या पावसाची गरज आहे.

-डाॅ. टी. जी. चिमनशेट्टे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.