शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

जिजाऊ वंदना गाऊन केले अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:10 IST

वाशी : मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा सावित्रिबाई ...

वाशी : मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा सावित्रिबाई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. जिजाऊ वंदना गाऊन अभिवादन करण्यात आले.

अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष संभाजी भांडवले यांनी मनाेगत व्यक्त केले. तरुणाईने मराठा सेवा संघाने दिलेल्या विचारांचे अनुकरण केल्यास समाज सुधारण्यासाठी अधिक विलंब लागणार नाही, असे ते म्हणाले. तर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव आशिष पाटील यांनी मराठा सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा सांगत, समाजात झालेल्या परिवर्तनाची माहिती दिली. तसेच मराठा सेवा संघाने समाजाला दिलेल्या पंचसूत्रीचे महत्त्व अधोरेखित करत महिलांना विविध क्षेत्रात पुढाकार घेण्यास कायम प्रेरित करणारं मराठा सेवा संघ हे एकमेव संघटन असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या तालुका कार्याध्यक्षपदी गाेलेगाव येथील प्रतापसिंह पाटील, तर तालुका सचिवपदी कन्हेरी येथील प्रमोद रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे वाशी तालुकाध्यक्ष दिनेश चौघुले, शुभम जाधव, ऋषीकेश चौघुले, गीता भांडवले, जिजाऊ ब्रिगेडच्या रंजना कात्रे, प्रा. वैदेही गंभीरे, मनीषा पवार, आदींची उपस्थिती हाेती.