जय भवानी प्रतिष्ठानने दिली रुग्णांसाठी ॲम्ब्युलन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:31 IST2021-05-01T04:31:24+5:302021-05-01T04:31:24+5:30
कसबे तडवळे हे गाव लातूर-बार्शी महामार्गावर आहे. त्यामुळे या भागात नेहमी छोटे-मोठे अपघात घडतात. अशावेळी रुग्णवाहिकेअभावी गंभीर रुग्णांना वेळेत ...

जय भवानी प्रतिष्ठानने दिली रुग्णांसाठी ॲम्ब्युलन्स
कसबे तडवळे हे गाव लातूर-बार्शी महामार्गावर आहे. त्यामुळे या भागात नेहमी छोटे-मोठे अपघात घडतात. अशावेळी रुग्णवाहिकेअभावी गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. अशा परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाइकांची हेळसांड होते. हीच बाब लक्षात घेऊन जयभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश जमाले यांच्या वतीने रुग्णांसाठी रुग्णवाहिका देण्यात आली आहे. शुक्रवारी या रुग्णवाहिकेचे लाेकार्पण पार पडले. या जिल्हा परिषद सदस्य कोंडाप्पा कोरे, माजी उपसरपंच विजयसिंह जमाले, शंकर होगले, चंद्रप्रकाश जमाले, माजी उपसरपंच तुळशीदास जमाले, किशोर डाळे, रामचंद्र महाराज, जाफर कोरबू, रहेमान तांबोळी, जयभवानी प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश जमाले, ग्रामपंचायत सदस्य विशाल जमाले, पंचायत समिती सदस्य सुधीर करंजकर, धनाजी होगले, श्रीमंत गावकरे, डॉ. धनंजय करंजकर, डॉ. उमाकांत सुतार, सुदर्शन करंजकर, शिवाजी नाळे, अल्ताफ मुजावर, शिवाजी कोरे, तेजेस भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा पाटील आदी उपस्थित हाेते.