नववीतील विद्यार्थिनीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:18 IST2021-02-05T08:18:59+5:302021-02-05T08:18:59+5:30

कळंबच्या बाजारातून माेबाइल लंपास उस्मानाबाद - केज तालुक्यातील साेनेगाव येथील सचिन गाेपाळ लांडगे हे ३१ जानेवारी राेजी साडेदहा वाजता ...

Humiliation of a ninth grader | नववीतील विद्यार्थिनीचा विनयभंग

नववीतील विद्यार्थिनीचा विनयभंग

कळंबच्या बाजारातून माेबाइल लंपास

उस्मानाबाद - केज तालुक्यातील साेनेगाव येथील सचिन गाेपाळ लांडगे हे ३१ जानेवारी राेजी साडेदहा वाजता कळंब येथील आठवडे बाजारात आले हाेते. गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने त्यांचा माेबाइल लंपास केला. याप्रकरणी लांडगे यांनी कळंब पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

पावणेपाचशे चालकांविरुद्ध कारवाई

उस्मानाबाद - माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४७३ वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंडापाेटी त्यांच्याकडून सुमारे १ लाख २ हजार ६०० रुपये वसूल केले आहेत. ही कारवाई अठरा पाेलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आली. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पाेलीस दलाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Humiliation of a ninth grader