स्केटिंग रेस स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST2021-07-14T04:37:47+5:302021-07-14T04:37:47+5:30

भूम : येथे आयोजित राज्यस्तरीय ओपन स्केटिंग रेस स्पर्धेत येथील समीर स्केटिंग स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी चांगले यश मिळविले. याबद्दल ...

Honoring the winners of the skating race | स्केटिंग रेस स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

स्केटिंग रेस स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

भूम : येथे आयोजित राज्यस्तरीय ओपन स्केटिंग रेस स्पर्धेत येथील समीर स्केटिंग स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी चांगले यश मिळविले. याबद्दल चौडेश्वरी सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेमध्ये श्रुती गजानन बागडे, प्रणव प्रवीण जोगदंड (वाशी) यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तसेच प्रतीक सुधीर बोत्रे, शिवम मारुती पोत्रे, आरती महेश बागडे, ज्ञानेश्वरी सोमनाथ दुधाळ, मधुरा अमोल बाबर, दामिनी परसू शिंदे, मयुरी हनुमंत देडे यांनी द्वितीय, तर हरिओम सोमनाथ दुधाळ, आरुष तुकाराम कटाटे, आर्या अमर नवले, मधुश्री महेश बागडे, धैर्यशील दत्ता पोत्रे, आर्यन ओव्हाळ यांनी तृतीय क्रमांक मिळविले. स्केटिंग प्रशिक्षण बॅचमध्ये प्रारब्ध अनिरुद्ध उनवणे यांनी बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांचा सपोनि गडवे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बार्शीच्या आर्यन सोपल स्केटिंग स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अश्विन चांदणे, समीर स्केटिंग स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक हमीद शेख, महिला स्केटिंग प्रशिक्षक सुलताना शेख व पालक उपस्थित होते.

120721\4631img-20210712-wa0086.jpg

भूम येथील चौडेश्वरी सभागृहात विद्यार्थी यांचा सत्कार करतान साहय्यक पोलिस फौजदार गडवे सोबत वैदकिय अधिकारी डॉ पोतरे व इतर मान्यावर

Web Title: Honoring the winners of the skating race