गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST2021-07-31T04:33:13+5:302021-07-31T04:33:13+5:30
भूम : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील सहापैकी पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा ...

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
भूम : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील सहापैकी पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला आहे.
२०२१ मध्ये या परीक्षा घेण्यात आलेल्या परीक्षेत अनुष्का गाडे, अजय क्षीरसागर, नोबल जाधव, तन्वी माने, मोनिका पोथरे हे पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, यामुळे सदरील विद्यार्थी यांचा सत्कार शिक्षण विभागातील विस्ताराधिकारी राहुल भट्टी व विशेष शिक्षक संजय कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल, के. सी. पवार, यू. पी. पायघन, हरिश साठे, उमाकांत पाटील, महादेव पालके, अनंता झरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक तात्या कांबळे यांनी केले. आभार पायघन यू. पी. यांनी केले.