गंगावणे यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:18 IST2021-02-05T08:18:07+5:302021-02-05T08:18:07+5:30

उस्मानाबाद : महावितरणच्या शहर उपविभागातील प्राधान तंत्रज्ञ शिवाजी गंगावणे यांना अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार ...

In honor of Gangavane | गंगावणे यांचा सन्मान

गंगावणे यांचा सन्मान

उस्मानाबाद : महावितरणच्या शहर उपविभागातील प्राधान तंत्रज्ञ शिवाजी गंगावणे यांना अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचारी हजर होते.

कारवाईची मागणी

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कॉफी शॉपमध्ये अनेक गैरप्रकार चालत असल्याचा आरोप करीत त्याच्या तपासणीची मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने केली आहे. निवेदनावर अंकुश हुंबे, आप्पासाहेब सिरसाठे आदींच्या सह्या आहेत.

पथदिवे बसवा

कळंब : शहरातील काही प्रभागातील अंतर्गत पथदिवे सातत्याने बंद राहत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय होत असून, पालिका प्रशासनाने याची पाहणी करुन दिवे सुरु करावेत, अशी मागणी होत आहे.

अपघाताचा धोका

उमरगा : शहरातील महामार्गासह रहदारीच्या मार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना देखील त्रास सहन करावा लागत असून, यातून अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

अवैध धंदे वाढले

लोहारा : तालुक्यातील कानेगावसह परिसरातील गावात अवैध दारू विक्री, मटका, जुगार यासारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम राबवून या धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: In honor of Gangavane