शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने होळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 6:25 AM

रविवारी हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी उत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिर रात्री एक वाजता उघडण्यात आले.

तुळजापूर (जि. धाराशिव) : आई राजा उदे-उदे, सदानंदाचा उदे- उदेच्या जयघोषात बँड व संभळाच्या वाद्यात पारंपरिक पद्धतीने बोंबा मारत होळीस  प्रदक्षिणा घालून तुळजाभवानी मंदिरात होळी पारंपरिक पद्धतीने रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या उत्साहात साजरी करण्यात आली. रविवारी हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी उत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिर रात्री एक वाजता उघडण्यात आले. प्रारंभी चरणतीर्थ होऊन सकाळी सहा वाजता नित्योपचार अभिषेक पूजा होऊन देवीची अलंकार पूजा मांडण्यात आली. 

यानंतर सायंकाळची अभिषेक पूजेची घाट होऊन पंचामृत अभिषेक पूजा संपन्न झाले. यानंतर धुपारती, नैवेद्य, अंगारा हे विधी पार पडले व  होम शाळेसमोर मांडण्यात आलेल्या होळीचे पूजन महंत हमरोजी, भोपे पुजारी गजानन परमेश्वर, अभिषेक सोंजी, नीलेश परमेश्वर, व्यवस्थापक तहसीलदार सोमनाथ वाडकर, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांच्या हस्ते करण्यात येऊन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. यानंतर सेवेकरी औटी यांनी मातंगीदेवी येथून अग्नी आणून महंत भोपेपुजारी व मंदिर व्यवस्थापक यांनी होळी प्रज्वलित केली. 

बोंब ठोकत होळीत श्रीफळ अर्पणयावेळी उपस्थित देवीभाविकांनी आई राजा उदे- उदेचा गजर करत बोंब ठोकत होळीत श्रीफळ अर्पण करून प्रदक्षिणा घालून दर्शन घेतले. यावेळी पुजारी, सेवेकरी, आराधी, गोंधळी व देवी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर शहरातील सार्वजनिक व घरातील होळी प्रज्वलित करण्यात आल्या. यावेळी चौका-चौकांनी तरुणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

टॅग्स :Holiहोळी 2024