शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आई तुळजाभवानीचं दर्शन, आरतीही केली; अमित ठाकरेंचं मिशन मराठवाडा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 15:28 IST

अमित ठाकरे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली, त्यानंतर ते तुळजापुरात कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी रवाना झाले.

उस्मानाबाद - मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. 06  ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर असा दहा दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून दौऱ्याची सुरुवात होऊन औरंगाबादला समाप्ती होणार आहे. त्यानुसार, अमित ठाकरे यांनी आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतले. सकाळी आरती करीत अमित ठाकरे यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले.  

अमित ठाकरे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली, त्यानंतर ते तुळजापुरात कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी रवाना झाले. त्यांच्या दौऱ्यातील नियोजनानुसार अमित ठाकरे आज मुक्कामी लातूर येथे जाणार आहेत. त्यानंतर, नांदेड, हिंगोली ,परभणी, बीड, जालना व  संभाजीनगर असा सात दिवस त्यांचा मराठवाडा दौरा असणार आहे. हा दौरा संघटनात्मक बांधणीसाठी असून माध्यमांशी बोलणार नसल्याचं अमित ठाकरे यांनी तुळजापुरात सांगितलं. दरम्यान, यौ दौऱ्यातून अमित ठाकरे हे पक्षाच्या बैठका घेत विद्यार्थी सेनेची बांधणी करणार आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता मराठवाड्यातील मनसैनिकांसाठी हा दौरा महत्वाचा ठरणार आहे.

असा असेल दौरा

याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत या दौऱ्याची माहिती दिली होती. 'येतोय नवनिर्माणाची वाज्रमुठ बांधण्यासाठी, महासंपर्क अभियान सहावा टप्पा, असे ट्विट राजू पाटील यांनी केले होते. तसेच, दौऱ्याची सुरवात उस्मानाबाद जिल्ह्यातून होणार असून, ज्यात 6 ऑक्टोबर तुळजापूर, 7 ऑक्टोबर उस्मानाबाद, 8 ऑक्टोबर लातूर, 9 ऑक्टोबर नांदेड, 10 ऑक्टोबर हिंगोली, 11 ऑक्टोबर परभणी, 12 ऑक्टोबर बीड, 13 ऑक्टोबर जालना, 14 – 15 ऑक्टोबर औरंगाबाद असा हा दौरा असणार आहे. 

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMarathwadaमराठवाडाMNSमनसेtuljapur-acतुळजापूर