शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कळंबमध्ये उभारतेय महिलांसाठी व्यायामशाळा अन्‌ उद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST

कळंब : येथील नगर परिषदेने फक्त महिलांसाठी व्यायामशाळा व उद्यानाच्या उभारणीचे काम हाती घेतले असून, जिल्ह्यात तालुका पातळीवर केवळ ...

कळंब : येथील नगर परिषदेने फक्त महिलांसाठी व्यायामशाळा व उद्यानाच्या उभारणीचे काम हाती घेतले असून, जिल्ह्यात तालुका पातळीवर केवळ महिलांसाठी उभारण्यात येणारे हे पहिले सार्वजनिक उद्यान ठरणार आहे. पालिकेच्या उपक्रमाचे शहरवासीयांतून जोरदार स्वागत होत आहे.

नगर परिषदेच्या ३१ ऑगस्ट २०१९ च्या सर्वसाधारण सभेत गाळे लिलावातून संकलित झालेल्या रकमेतून शहरातील विकासकामे हाती घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. शहरातील पुनर्वसन सावरगाव भागातील २४ गुंठे जागेवर व्यायामशाळेचे आरक्षण आहे. सत्ताधारी मंडळींच्या संकल्पनेतून उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी त्या बैठकीत या ठिकाणी महिलांसाठी व्यायामशाळा व फक्त महिलांसाठी बगीचा निर्माण करण्याचे सुचविल्यानंतर सभागृहाने एकमताने हा ठराव एकमताने मान्य केला. या ठरावानुसार त्या जागेत अंदाजे एक हजार स्क्वेअर फूट जागेत फक्त महिलांसाठी बंदिस्त व्यायामशाळा बांधली जाणार असून, उर्वरित जागेत फक्त महिलांसाठी खुले उद्यान उभारले जाणार आहे.

या कामासाठी पहिल्या टप्प्यातील ८८ लाख रुपयाच्या निविदेला मंजुरी देऊन सध्या काम सुरू करण्यात आले आहे. ज्यात संरक्षक भिंत, बंद व्यायामशाळेचे हाॅल व उद्यानाचे काम केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात व्यायामशाळा हाॅलमध्ये बसावयाचे साहित्य तसेच खुल्या उद्यानात बसावयाचे व्यायाम व मनोरंजनाचे साहित्याची निविदा प्रकाशित करून काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे ७५ लाख रुपयाचा खर्च अपेक्षित आहे.

चौकट -

महिलांसाठी हक्काचे ठिकाण

शहरात महिलांसाठी, त्यांच्या विरुंगळ्यासाठी तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यासाठी कोणतेही ठिकाण उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेवून पालिकेने हा प्रकल्प प्राधान्याने हाती घेतला आहे. या ठिकाणी फक्त महिलांसाठी व दहा वर्षांखालील बालकांसाठी प्रवेश ठेवला जाणार असून, या व्यतिरिक्त इतर लोकांना प्रवेश दिला जाणार नाही. या ठिकाणी संबंधिताना विनामूल्य प्रवेश असेल. अगदी देखभाल करणारे वाॅचमनदेखील महिलाच असतील, अशी सर्वसाधारण रचना असून, हा प्रकल्प पाच महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

कोट.......

फक्त महिलांसाठी, त्यांना दैनंदिन जीवनात विरंगुळा मिळावा यासाठी तसेच त्यांचे स्वास्थ्य व्यवस्थित राहावे, यासाठी हा प्रकल्प आम्ही उभा करीत आहोत. यामध्ये तांत्रिक अडथळे आले, पण जनहितासाठी सर्व यंत्रणांनी आम्हाला सहकार्य केले. अनेक अडथळ्यांवर मात करून आम्ही हा प्रकल्प पूर्ण करीत आहोत. हा वैयक्तिक माझ्यासाठी संस्मरणीय प्रकल्प राहणार आहे.

- सुवर्णा मुंडे, नगराध्यक्ष

फक्त महिलांसाठी व्यायामशाळा व उद्यान निर्माण करणारी कळंब नगर परिषद जिल्ह्यातील बहुदा पहिलीच नगर परिषद ठरेल. या प्रकल्पाचे अनुकरण जिल्हा तसेच बाहेरीलही नगरपालिका करतील अशा पद्धतीने हा प्रकल्प पूर्ण करू.

- संजय मुंदडा, उपनगराध्यक्ष

कॅप्शन - कळंब येथील सावरगाव पुनर्वसन भागातील याच ठिकाणी फक्त महिलांसाठी व्यायामशाळा व उद्यान उभारण्यात येणार आहे.