लाखो रुपयांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:38 IST2021-07-14T04:38:04+5:302021-07-14T04:38:04+5:30
तुळजापूर : राज्य सरकारने गुटख्याची निर्मिती आणि विक्रीवर कायदेशीर बंदी घातली असली तरी शहरासह तालुक्यात मात्र राजरोस याची ...

लाखो रुपयांचा गुटखा जप्त
तुळजापूर : राज्य सरकारने गुटख्याची निर्मिती आणि विक्रीवर कायदेशीर बंदी घातली असली तरी शहरासह तालुक्यात मात्र राजरोस याची विक्री सुरूच आहे. येथील पोलीस प्रशासनाने शहरातील शुक्रवार पेठ भागात टाकलेल्या छाप्यातही तब्बल १ लाख ९० हजार ८८५ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी सोमवारी एकावर गुन्हा दाखल झाला.
मिळालेल्या माहितीवरून, तुळजापूर येथील पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांच्या पथकाने शुक्रवार पेठ येथील आत्माराम उर्फ राम बबन जाधव यांच्या घरी छापा टाकला. यावेळी तेथे १ लाख ९० हजार ८८५ रुपये किमतीचा विविध प्रकारचा गुटाखा, सुगंधी तंबाखू साठा करून ठेवल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी तुळजापूर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला पत्रव्यवहार केल्यानंतर तब्बल दोन दिवसांनी अन्न व औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी प्रमोदकुमार काकडे यांच्या फिर्यादीवरून आत्माराम उर्फ राम बबन जाधव यांच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.