‘संस्कार भारती’कडून गुरुपाैर्णिमा साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:00+5:302021-07-24T04:20:00+5:30
उस्मानाबाद- शहरातील शिवशंभू पंढरी वसाहतीत स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी जिल्हा शाखा, रामकृष्ण मंडळ,संस्कार वर्ग, संस्कार भारतीच्या वतीने गुरु पौर्णिमा ...

‘संस्कार भारती’कडून गुरुपाैर्णिमा साजरी
उस्मानाबाद- शहरातील शिवशंभू पंढरी वसाहतीत स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी जिल्हा शाखा, रामकृष्ण मंडळ,संस्कार वर्ग, संस्कार भारतीच्या वतीने गुरु पौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नटराज व प्रतिमा पूजनानंतर संस्कार भारतीच्या ध्येय गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एसएससी परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद कन्याकुमारी स्मारकाची प्रतिमा महापुरुषांच्या चरित्राची पुस्तके देऊन प्रा. शामराव दहिटणकर, डॉ.अजित नायगावकर, संस्कार भारती जिल्हाप्रमुख शेषनाथ वाघ, उपजिल्हाप्रमुख अनिल ढगे यांचे हस्ते विशाखा संभाजी बागल, प्रतीक्षा सतीश जाधव, श्रावणी सुरेश वाघमारे, श्रद्धा काकडे, अनिकेत सतीश कोळगे, व्यंकटेश सयाजी वाकुरे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्कार भारती सचिव सुरेश वाघमारे सुंभेकर, ज्येष्ठ नागरिक भालचंद्र शहापुरे, सुनीता दहिटणकर,कुमार व्यास, विश्वंभर महाजन, रामेश्वर धुमाळ, अविनाश माने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निकिता इंदापुरकर, सार्थकी वाघ, कल्याणी वाकुरे, दिशा सलगर, सत्यहरी वाघ, कृष्णा इंदापूरकर, अर्जुन माळी, गुरुनाथ माळी, आदित्य माळी, समीर मते, अर्णव दहिटणकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन निलेश कुलकर्णी आभार ऋषिकेश जयकर यांनी मानले.