किराणा दुकान फाेडले, मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:32 IST2021-07-29T04:32:17+5:302021-07-29T04:32:17+5:30

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथे वसीम अक्रम अफसर मुल्ला यांचे किराणा दुकान आहे. ...

Grocery store opened, Muddamal Lampas | किराणा दुकान फाेडले, मुद्देमाल लंपास

किराणा दुकान फाेडले, मुद्देमाल लंपास

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथे वसीम अक्रम अफसर मुल्ला यांचे किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे २६ जुलैच्या सायंकाळी किराणा दुकान बंद करून मुल्ला घरी गेले हाेते. दरम्यान, दुकान बंद असल्याची संधी साधत अज्ञात चाेरट्यांनी २६ ते २७ जुलै या कालावधीत दुकानाचे कुलूप ताेडून आत प्रवेश मिळविला. यानंतर आतील किराणा साहित्यासह राेख रक्कम लंपास केली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी मुल्ला किराणा दुकान उघडण्यासाठी आले असता, चाेरीची घटना उघडकीस आली. यानंतर थाेडाही विलंब न करता त्यांनी मुरूम पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरुद्ध भादंसंचे कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

दरम्यान, तालुक्यात मागील काही दिवसांपासून लहान-माेठ्या चाेरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अशा चाेरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पाेलिसांनी ठाेस पावले उचलावीत, अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांतून हाेत आहे. सततच्या घटनांमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Grocery store opened, Muddamal Lampas