गॅरेज, चायनीज दुकान उघडे, तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST2021-07-24T04:19:58+5:302021-07-24T04:19:58+5:30
भरदिवसा पळवून नेली मोटारसायकल उस्मानाबाद : वाशी येथील रहिवासी असलेले महादेव उंदरे यांची दुचाकी चोरीस गेल्याची घटना नुकतीच घडली ...

गॅरेज, चायनीज दुकान उघडे, तिघांवर गुन्हा
भरदिवसा पळवून नेली मोटारसायकल
उस्मानाबाद : वाशी येथील रहिवासी असलेले महादेव उंदरे यांची दुचाकी चोरीस गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. उंदरे हे १९ जुलै रोजी सकाळी आपल्या दुचाकीवरून दसमेगाव रस्त्यावरील शेताकडे गेले होते. शेतात व्यवस्थित रस्ता नसल्याने त्यांनी दुचाकी रस्त्यालगत लावली होती. शेतीकाम आटोपल्यानंतर दुपारी १२.१० वाजता ते परत दुचाकी लावलेल्या ठिकाणी आले. मात्र, तेथे ती दिसून आली नाही. तीन दिवस शोध घेऊनही ती न मिळाल्याने गुरुवारी वाशी ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला.
देवसिंग्यात घरफोडी, दागिने रोकड लंपास
उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यात दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. देवसिंगा तुळ. येथील हरिश्चंद्र आण्णासाहेब कुसाळकर व तुळजापूर शहरातील सुनील दादा मोरे यांच्या घराचे कुलूप तोडून आतील सोने-चांदीचे दागिने, गॅस शेगडी व रोकड पळवून नेली. या दोन्ही घटनांत एकूण १ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला आहे. याप्रकरणी तुळजापूर ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.